रुग्ण तपासणीकरिता येतात; परंतु डॉक्टर, नर्स कुणीही रुग्णालयात उपस्थित राहत नसल्याने त्यांना आल्यापावली परत खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते व गरिबांना आर्थिक भुर्दंड बसतो. बेटाळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे कोणतेही अधिकारी लक्ष देत नसल्याने येथील आरोग्य कर्मचारी स्वाक्षरी मारून घरी जातात व उपस्थित राहत नाहीत. बुधवार, दि. ११ ऑगस्ट रोजी ४.३० वाजता तर संपूर्ण आरोग्य केंद्र सपाट उघडे व वाऱ्यावर होते. येथे एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन येथील दोषी, कामचुकार कार्यरत कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करून गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर जनतेला न्याय देण्यात यावा, अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्र, बेटाळा येथे ‘कुलूप ठोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विश्वनाथ बांडेबुचे, वासुदेव गाढवे, गजानन सपाटे, देवनाथ बांडेबुचे व गावकऱ्यांनी दिला आहे.
बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:36 IST