शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

मोहाडी तालुक्याचा पशुसंवर्धन विभाग ‘रामभरोसे’

By admin | Updated: January 19, 2016 00:30 IST

मोहाडी तालुक्याचा राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभाग डॉक्टरांविना रामभरोसे आहे.

प्रभारावर कारभार : चारपैकी तीन दवाखान्यात डॉक्टरांची पदे रिक्त, कधी येणार अच्छे दिन?युवराज गोमासे  करडी (पालोरा)मोहाडी तालुक्याचा राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभाग डॉक्टरांविना रामभरोसे आहे. या विभागांतर्गत ४ पशुवैद्यकीय दवाखाने असून ३ डॉक्टरांचे पद रिक्त आहेत. प्रभारावर मोहाडी, कोका, मुंढरी येथील दवाखान्याचा कारभार चालविला जात असून ३९ हजार जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. या गंभीर बाबीकडे शासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने कधी येणार ‘अच्छे दिन’ असा प्रश्न विचारला जात आहे.मोहाडी तालुक्यात राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागांतर्गत असलेल्या तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा बिकट प्रश्न निर्माण होत चालला आहे. या विभागाअंतर्गत मोहाडी, कोका, मुंढरी, जांब येथे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यापैकी केवळ जांब येथील दवाखान्यात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ.येडेवार व एका परिचराचे पद भरलेली आहेत. मोहाडी येथे पशुधन विकास अधिकारी, पशु पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यकाचे पद रिक्त आहे. नाईलाजास्तव सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ.येडेवार व एका परिचराचे पद भरलेली आहेत. मोहाडी येथे पशुधन विकास अधिकारी, पशुपर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यकाचे पद रिक्त आहे. नाईलाजास्तव सहाय्यक आयुक्त नितीन ठाकरे यांना पशुधन विकास अधिकाऱ्याचे काम सांभाळावे लागत आहे. जनावरांची चिकित्सा व विभागाचे काम सांभाळताना त्यांना कसरत करावी लागत आहे. कोका व मुंढरी येथील दवाखान्यात अनुक्रमे सुमारे १० व १५ वर्षापासून सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. मुंढरी येथे दोन महिन्यापूर्वी परिचर लांडगे सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून येथे परिचराचे पद रिक्त आहे. डॉ.येडेवार यांचेकडे कोका व मुंढरी दवाखान्याचा प्रभार सोपविण्यात आलेला आहे. जांब येथून दोन्ही दवाखान्याचा व परिसरातील जवळपास २४ हजार जनावरांचा इलाज करताना त्रास होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांना अनेक रोगांची लागण होऊन जनावरे मृत्यूमुखी पडतात. शासनाला नेहमी डॉक्टरांच्या कमतरतेचा अहवाल दिला जात असताना पदे भरली जात नाही. शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका सहन करावा लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.जनावरांचे आरोग्य धोक्याततालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय मोहाडी येथे एकुण ११ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५ पदे भरलेली असून ६ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये पशुधन विकास अधिकारी १, पशुधन पर्यवेक्षक १, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी २, वरिष्ठ सहाय्यक १ व परिचराचे १ आदींचा समावेश आहे. चार दवाखान्यांतर्गत तालुक्यात एकूण ४६ हजार जनावरांची संख्या असून मोहाडी दवाखान्यांतर्गत सुमारे १५ हजार जनावरांची संख्या असून त्यामध्ये गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या व अन्य जनावरांचा समावेश आहे. कोका दवाखान्यांतर्गत १६ हजार, मुंढरी अंतर्गत ८ हजार, जांब अंतर्गत जवळपास ७ हजार जनावरांची संख्या आहे. ४ डॉक्टरांच्या पदापैकी फक्त १ डॉक्टरांचे पद भरलेली आहो. ३ डॉक्टरांचे पद रिक्त आहेत.बोगस डॉक्टरांकडून गोपालकांची लुबाडणूक राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने खासगी बोगस झोलाछाप डॉक्टरांकडून पशुपालकांची फसवणूक व आर्थिक लुबाडणूक होत आहे. डॉक्टरी पेशाचे ज्ञान नसलेल्या इसमांकडून जनावरांचा नाईलाजाने इलाज करावा लागत आहे. त्यामुळे योग्य इलाजाअभावी पशुंचा मृत्यू होत असून त्यांचे शवविच्छेदन व त्यासंबंधाची कागदपत्रे शेतकरी वर्गाला वेळेवर मिळत नाही. कधी तासन्तास तर कधी दुसऱ्या दिवसापर्यंत डॉक्टरांची वाट पाहावी लागते. त्यामुळे नुकसान भरपाईस विलंब होऊन अनेकांना भरपाईपासून वंचित राहावे लागते. यामुळे अनेकदा प्रकरण दाखल करण्यास शेतकरी मागेपुढे पाहतात.रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढत चालला आहे. प्रभारांमुळे जनावरांकडे निट लक्ष देता येत नाही. शासनाला प्रत्येकवेळी अहवाल दिला जातो. उपाययोजना अजूनही झालेल्या नाहीत. तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय मोहाडी अंतर्गत चार दवाखाने आहेत. जांब येथील दवाखाना वगळता मोहाडी, कोका, मुंढरी येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहेत. एकूण ११ पदांपैकी ६ पदे भरलेली आहेत.- डॉ. नितीन ठाकरे, सहाय्यक आयुक्त, मोहाडीडॉक्टरांचे पद रिक्त असल्याने नेहमी शेतकरी वर्गाला अडचणीचा सामना करावा लाभतो. खासगी बोगस व्यक्तींकडून जनावरांचा उपचार करावा लागतो. डॉक्टरांचे पद भरणे गरजेचे आहे.- श्रीकांत डोरले, शेतकरी, करडीमुंढरी व कोका दवाखान्यातील डॉक्टरांचे रिक्त पद भरण्यासाठी शासन प्रशासनाला अनेकदा कळविण्यात आले. माहिती देण्यात आली. अधिकारी व लोकप्रतिनिधींना याची माहिती असताना आवाज उठविला जात नाही. - संजय भोयर, शेतकरी कान्हळगावमुंढरी येथील दवाखाना राज्य शासनाच्या अधिन आहे. दवाखान सुसज्ज असला तरी अनेक वर्षापासून पद रिक्त आहे. पद भरण्यासाठी शासनाला अनेकदा कळविण्यात आले. ग्राम पंचायतीमार्फत ठरावही पाठविण्यात आले. दोन महिन्याअगोदर परिचरही सेवानिवृत्त झाल्यापासून दवाखाना कायमचा बंद असतो. परिसरातील पशुंची संख्या लक्षात घेता शासनाने लवकरात लवकर डॉक्टर पुरविणे गरजेचे आहे. अन्यथा आंदोलनात्मक भूमिका स्वीकारावी लागेल.- सारिका चौरागडे, जि.प. सदस्या मुंढरी.