शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पालांदुरात भजनाच्या तालात नंदीसह गावफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:17 IST

पूर्वीचा बापू महाजनांचा वाडा आता देवराम महाराजांचा वाडा या नावाने ओळखला जात आहे. वाड्यात कुणाला सहजतेने प्रेम, माया मिळते. वर्षभर आपुलकीने जगत गुण्यागोविंदाने नांदणारा हा वाडा तान्हा पोळ्याच्या निमित्ताने गावात वडीलोपार्जीत नंदी भजनांच्या साक्षीने फेरी घालतो.

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : संस्कृती जपावी ती भारतीयांनी म्हणतात ते खरंच आहे. जग कितीही बदलेल. मात्र आम्ही पारंपारिकतेचे पाईक आहोत. हे पोळा सणाला जगाला कळते. पोळ्याचा दुसरा दिवस म्हणजे तान्हा पोळा. या दिवशी परंपरेने आजही तान्हा पोळ्याला देवराम महाजनांच्या वाड्यातील चार फुट उंचीचा नंदी अख्खा गावाला भजनांच्या संगतीने दहीकाला वाटत सहिष्णूता जपतो आहे.पूर्वीचा बापू महाजनांचा वाडा आता देवराम महाराजांचा वाडा या नावाने ओळखला जात आहे. वाड्यात कुणाला सहजतेने प्रेम, माया मिळते. वर्षभर आपुलकीने जगत गुण्यागोविंदाने नांदणारा हा वाडा तान्हा पोळ्याच्या निमित्ताने गावात वडीलोपार्जीत नंदी भजनांच्या साक्षीने फेरी घालतो. गावात सर्वात मोठा नंदी असून फार पूर्वी लाखांदूर तालुक्यातील चप्राड इथून १० कुडव धानाने खरेदी केला होता. अत्यंत सुरेख देखणा नंदी सर्वांना भुरळ न पाडेल तर नवलच. नंदीच्या गावफेरीला गावकऱ्यांची मोठी गर्दी असते.अखंड परंपरा महिलांचा, पुरुषांचा संगीतमय भजन सर्वांना मंत्रमुग्ध करतो. नंदीला सप्रेम नमस्कार करीत गावकरी नंदीसोबत पुढे पुढे चालतात. असा अविस्मरणीय सोहळा सर्वांच्याच नजरेचे पारणे फेडतो. पालांदुरला वेगळेपणा जपण्यास या वाड्यातील नंदीचे मोलाचे स्थान आजही टिकून आहे. आजोबांची अखंड परंपरा आजही टिकून आहे. वाड्यातील लहान मोठे सर्व सदस्य सहकार्य करीत असल्याने कार्य सिद्धीला जाते. गावकरीही सहभाग देत असल्याने उत्साह टिकून आहे.

टॅग्स :Socialसामाजिक