शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

भंडारा जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग, गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 12:42 PM

भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे मोहाडी शहरातील रस्ते व नाले जलमय झाले असून अनेक भागातील घरात पाणी शिरले आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

ठळक मुद्देनदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भंडारा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सततच्या पावसामुळे मोहाडी येथे सकल भागातील अनेक घरात पाणी शिरले. तर, गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस बरसल्याने प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

हवामान विभागाने चार दिवस सतत पाऊस पडणार असल्याचे अंदाज वर्तवला असताना आज सलग दुसऱ्या दिवशी भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे मोहाडी शहरातील रस्ते व नाले जलमय झाले असून अनेक भागातील घरात पाणी शिरले आहे. सततच्या पावसामुळे गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. यातील १३ दरवाजे एक मीटरने तर २० दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत.

गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी तसेच केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार धरणामधुन सध्या २५४६ क्युमेक्स ने सुरू असलेला विसर्ग सकाळी ७ पासून ५ वाजेपर्यंत ५००० क्युमेक्स पर्यंत वाढविण्यात येईल. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधून आवागमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी