शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

पावसाची दडी, जिल्ह्यावर दुष्काळाची छाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 1:14 AM

पावसाळ्याचा सव्वा महिना लोटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस बरसला नाही. परिणामी खरीप हंगामातील पेरणी धोक्यात आली आहे. शेतकरी पीक वाचविण्यासाठी वाट्टेल त्या उपाययोजना करीत असला तरी पीके करपण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देपऱ्हे वाचविण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा : खंडित वीज पुरवठ्याने शेतकऱ्यांत संताप, महिनाभरापासून पाऊस बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळ्याचा सव्वा महिना लोटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस बरसला नाही. परिणामी खरीप हंगामातील पेरणी धोक्यात आली आहे. शेतकरी पीक वाचविण्यासाठी वाट्टेल त्या उपाययोजना करीत असला तरी पीके करपण्याच्या मार्गावर आहे. एकदोन दिवसात पाऊस न बसल्यास जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया पसरली आहे.करडी परिसरात ओढवला कोरडा दुष्काळकरडी (पालोरा) : करडी परिसरात पाच वर्षात कधी नव्हे अशी कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. २२ दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. शेतीत केलेली मशागत, झालेला खर्च वाया जाण्याची भीती आहे. दुबार पेरणीची वेळ निघून गेल्याने करावे तरी काय? असा प्रश्न आहे. करपलेली पऱ्हे व भेगा रोवणीला वाचविण्यासाठी तलाव बोड्या व नाल्यांतील तर काहींनी टँकरने पाणी पुरवठा सुरु केला. परंतु वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने संतापात भर पडत आहे. निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांना मारक ठरली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कृषीपंप आहेत, मात्र त्यांना केवळ आठ तास वीज पुरवठा केला जातो. त्यातही रात्री वीज दिली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहेत. वीज दिली जात असताना वारंवार पुरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे वारंवार पंप सुरु करण्यासाठी शेतात जावे लागत आहे.उन्हाळ्यासारखे उन तापत असल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. काही प्रमाणात विहिर, तलाव, बोड्या व नाल्यात साठविलेले पाणी तळाला गेले आहेत. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई गावांगावात निर्माण झाली आहे. पऱ्हे जगविण्यासाठी दमछाक होत आहे. दुबार पेरणीसाठी धान्य नाहीत, हातात पैसा नाही. शेतकरी बिकट संकटात सापडला असून कर्जाचे डोंगर निर्माण होण्याची शक्यता आाहे. कुटुंबाचा चरितार्थ, शिक्षण, आरोग्य या बाबीच्या विचाराने शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण आहे.पवनी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर कराकोंढा कोसरा : पावसाळा सुरु होऊन एक महिना होत आहे. पण दमदार पाऊस न आल्याने धान पीक जाण्याच्या मार्गावर आहे. दररोज ऊन तापते आहे. त्यामुळे धानाचे पºहे सुकत आहेत. तेव्हा पवनी तालुका दुष्काळग्रस्त करण्याची मागणी होत आहे.तालुक्यात २५ टक्के धान पीक सिंचनाखाली असले तरी ७५ टक्के धान पीक निसर्गाच्या कृपेवर आहे. शेतकºयांनी बँक, सहकारी सोसायटी यांच्याकडून पीक कर्ज घेऊन काहींनी इकडून तिकडून व्याजाने पैसे काढून धानाचे पऱ्हे टाकले आहे. परंतु सध्या धानाची रोवणी करण्यासाठी दमदार पाऊस पडला नाही. एक महिन्यापासून पाऊस आला तर फक्त सडा टाकल्यासारखा जमीन ओली करण्यापुरता येत आहे. तसेच तापमान वाढत आहे. यामुळे शेतातील पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर आहे. कमी दिवसाचे म्हणजे ९० ते ११० दिवसाच पºहे रोवणीसाठी आले असून येत्या आठ दिवसात पाऊस न पडल्यास कमी दिवसाचे पºहे रोवून काही उपयोग होणार नाही. यामुळे पवनी तालुक्यात ९० ते १००, १२० दिवसाचे पºहे रोवले जाते. अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे. पीक विम्याचे पैसे कर्ज घेताना बँक, सहकारी संस्था जबरदस्तीने घेतात. पण या परिसरात पीक विम्याचा लाभ कोणालाच मिळत नाही. सध्या तरी पवनी तालुक्यात दमदार पाऊस न पडल्याने दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे.पावसाने डोळे वटारले, शेतकरी चिंतातूरभुयार : दरवर्षी शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते. भुयार, वायगाव, निष्टी, निलज, मेंढेगाव, काकेपार इ. भुयार परिसरातील गावातील शेतकऱ्यांना धानाचे पऱ्हे जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकांचे पºहे वाळण्याच्या स्थितीत दिसत आहेत. बहुतांश शेतकरी कोरडवाहू असल्याने पाण्याचे साधन नाही. पाणी येण्यापूर्वी शेतकऱ्यांनी नांगरण वखरण करून मोठ्या आशेने शेती रोवणीसाठी तयार करून ठेवली होती. परंतु धानाचे पºहे टाकल्यानंतर पावसााने दडी मारल्याने पºहे वाळण्याच्या मार्गावर असून दुबार पेरणीचे संकट आले आहे.महागडे बिजायत टाकून मोड आल्याने आता दुबार पेरणीसाठी बिजायत आणायचा कुठून हा प्रश्न शेतकºयांना भेडसावत आहे. मशागतीसाठी जवळ असलेला पैसा खर्च आल्याने शेतकरी आणखी पैसा कुठून आणायचा या प्रश्नात शेतकरी पडलेला दिसत आहे. अनेकांचे धानाचे पºहे वाळले असून अनेक जण पºहे वाचविण्यासाठी बादली व घागऱ्याने पºह्यांना पाणी देताना दिसत आहेत.शेतकऱ्यांना मदतीची गरजधानाचे पºहे व रोवणी वाळण्याच्या मार्गावर आहेत. दुबार पेरणीसाठी पैसा व धान्य नाहीच. दयनीय अवस्थेतील शेतकऱ्यांना त्वरीत मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी, सावरण्यासाठी शासनाने बेटाळा, मुंढरी, रोहणा व पालोरा परिसर दुष्काळग्रस्त घोषीत करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ढिवरवाड्याचे सरपंच धामदेव वनवे यांनी केली आहे.१६ तास वीज पुरवठा करण्याची मागणीअस्मानी संकटाबरोबर सुलतानी संकटही शेतकऱ्यांना यावर्षी झेलावे लागत आहे. शेतीला पाणी देण्यासाठी निदान १६ तास विजेची गरज असताना आठ तास रात्रीला वीज दिली जाते. त्यातही वारंवार वीज पुरवठा खंडीत केला जातो. आठ तासात रोवणी व वाळलेले पºहे कसे जगवायचे? दुष्काळी परिस्थितीचा विचार करता त्वरीत बेटाळा जिल्हा परिषद क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या सरिता चौरागडे यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती