शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

चार महिन्यांमध्ये बरसला फक्त ७० टक्के पाऊस

By admin | Updated: September 27, 2014 23:09 IST

पावसाच्या मानाने बरा समजला जाणारा भंडारा जिल्हा यावर्षी मात्र तहाणलेला तर राहणार नाही, अशी शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या मान्सूनमध्ये ७० टक्क्यांनी घट झाली आहे.

भूजल साठ्याची पातळी बरी : मागील वर्षीपेक्षा घटइंद्रपाल कटकवार - भंडारापावसाच्या मानाने बरा समजला जाणारा भंडारा जिल्हा यावर्षी मात्र तहाणलेला तर राहणार नाही, अशी शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या मान्सूनमध्ये ७० टक्क्यांनी घट झाली आहे. गतवर्षी १४० टक्के पाऊस बरसला होता तर यावर्षी याची टक्केवारी ७१ टक्के इतकी आहे. जिल्ह्यात सरासरी १३३०.२ मि.मी. पाऊस बसला पाहिजे. दि.२७ सप्टेंबर २०१४ पर्यंत सरासरी ८८८.६ मि.मी. पाऊस बरसला आहे. मागीलवर्षीच्या याच दिवसाची सरासरी १६५९.५ मि.मी. इतकी होती. म्हणजेच यावर्षी निम्म्याने घट झाली आहे. यावर्षी बरसलेल्या तालुकानिहाय पावसाच्या आकडेवारीनुसार भंडारा ९३०.१ मि.मी., मोहाडी ७९४.३, तुमसर ९३८.४, पवनी ८१४.८, साकोली १०३२.४, लाखांदूर ७८१.९ तर लाखनीत ९२८.३ मि.मी. पाऊस बरसल्याची नोंद आहे. या सर्वांची बेरीज ६२२०.२ मि.मी. असून याची सरासरी ८८८.६ मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरीच्या मानाने पावसाची टक्केवारी ७१ टक्के इतकी आहे. सन २०१३ च्या मान्सून सत्रात तालुकानिहाय बरसलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार भंडारा १६०३ मि.मी., मोहाडी १३५५, तुमसर १४१६.२, पवनी १६६०.७, साकोली १८३१.१, लाखांदूर १९०४.८ तर लाखनीत १८४५.४ मि.मी. पाऊस बरसला होता. या सर्वांची बेरीज ११६१६.२ मि.मी. इतकी असून त्याची सरासरी १६५९.५ इतकी होती. त्याची टक्केवारी १४० इतकी होती. दरवर्षी १ जून ते ३१ आॅक्टोंबरपर्यंत बरसणाऱ्या पावसाची आकडेवारी व सरासरी पावसाची नोंद करण्यात येते. यावर्षीच्या दि.३१ आॅक्टोबरपर्यंत पावसाची सरासरी शंभरी गाठणार काय, असा प्रश्न आहे.