शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

जिल्ह्यात पाऊस सरासरीएवढा, पण धान राेवणी रखडलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धान पिकासाठी इतर पिकांपेक्षा पाऊस अधिक हवा असताे. नर्सरीत पऱ्हे टाकल्यानंतर राेवणीसाठी चिखलनी याेग्य पाऊस आवश्यक असताे. जिल्ह्यात मृग नक्षत्रापासून पाऊस बरसला असला तरी सुरुवातीच्या काळात बरसला. पऱ्हे राेवणीयाेग्य झाल्यानंतर पावसाने पाठ फिरविली. तीन आठवडे कडक ऊन तापले. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या हाेत्या. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी राेवणी आटाेपली.

ठळक मुद्देजाेरदार पावसाची प्रतीक्षा : जिल्ह्यात आतापर्यंत ५३२.४ मिमी पाऊस

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण  राज्यात पावसाने हाहाकार उडविला असताना भंडारा जिल्हा मात्र अपवाद ठरत आहे. गत चार दिवसात पाऊस काेसळला असला तरी राेवणीयाेग्य धुंवाधार पाऊस बरसलाच नाही. दुसरीकडे पावसाने आतापर्यंतची सरासरी गाठली असली तरी राेवणी मात्र रखडलेलीच आहे. जिल्ह्यात १ जून ते २४ जुलैपर्यंत ५३२.४ मिमी पावसाची नाेंद झाली असून हा सरासरीच्या ९९ टक्के आहे. या पावसाने पऱ्हे व राेवणी झालेल्या धानाला जीवदान मिळाले असले तरी राेवणीसाठी मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धान पिकासाठी इतर पिकांपेक्षा पाऊस अधिक हवा असताे. नर्सरीत पऱ्हे टाकल्यानंतर राेवणीसाठी चिखलनी याेग्य पाऊस आवश्यक असताे. जिल्ह्यात मृग नक्षत्रापासून पाऊस बरसला असला तरी सुरुवातीच्या काळात बरसला. पऱ्हे राेवणीयाेग्य झाल्यानंतर पावसाने पाठ फिरविली. तीन आठवडे कडक ऊन तापले. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या हाेत्या. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी राेवणी आटाेपली. परंतु भारनियमनामुळे कठीण झाले हाेते. गत आठवड्यापर्यंत जिल्ह्यात ४० हजार हेक्टरवरच राेवणी झाली हाेती. ती एकूण क्षेत्राच्या केवळ २५ टक्के हाेती. दरम्यान मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. परंतु हा पाऊस जाेर नसल्यासारखा काेसळत हाेता. राज्यात सर्वत्र हाहाकार उडाला असताना भंडारा जिल्ह्यात मात्र रिमझिम पाऊस बरसला. हा पाऊस राेवणीयाेग्य नसल्याने अद्यापही शेतकरी राेवणीची हिम्मत करताना दिसत नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३.२ मिमी आहे. १ जून ते २४ जुलै या कालावधीत ५३८.६ मिमी पाऊस अपेक्षित असताे. जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत ५३२.४ मिमी म्हणजे सरासरीच्या ९९ टक्के पाऊस काेसळला. परंतु हा पाऊस अगदी सुरुवातीच्या काळातील आहे. गत तीन दिवसातील आकडेवारी बघितली तर शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच दिसत आहे.२४ जुलै राेजी जिल्ह्यात १.८ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. २३ जुलै राेजी २५.८ मिमी, २२ जुलै राेजी ४०.६ मिमी, २१ जुलै राेजी १४.७ मिमी अशी पावसाची नाेंद झाली आहे. या चार दिवसात जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस काेसळला नाही. त्यामुळे राेवणी रखडलेली आहे. 

जिल्ह्यात केवळ २५ टक्के क्षेत्रावर राेवणी- भंडारा जिल्ह्यात कृषी विभागाच्या नियाेजनानुसार एक लाख ६१ हजार ४९३ हेक्टरवर धान पीक घेतले जाणार आहे. आतापर्यंत सुमारे ४५ हजार हेक्टरवरच राेवणी झाली आहे. साधारणत: २५ टक्के राेवणी आटाेपली आहे. अद्यापही माेठ्या प्रमाणात राेवणी रखडल्याचे दिसून येत आहे. यामागचे कारण म्हणजे गत दाेन आठवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊसच झाला नाही. गत तीन दिवस काेसळलेल्या पावसाने केवळ पऱ्ह्यांना आणि रोवणीला जीवनदान दिले आहे. मात्र आता शेतकरी किती दिवस पऱ्हे नर्सरीत ठेवायचे असे म्हणत राेवणीची गडबड करीत आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती