शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस; रबी पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:00 IST

मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी ३.३० च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. पावसासह गाराही पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मंगळवारी असलेल्या आठवडी बाजारातही नागरिकांची तारांबळ उडाली. शेतातील पिकांचेही नुकसान झाले. शहरातील सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले. तर काही घरात पाणी शिरले. मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारा व गारासह तुमसर शहर व तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पुन्हा एकदा वेधशाळेचा अंदाज खरा ठराला आहे. मंगळवारी दुपारी मेघगर्जनेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी गारांसह पाऊस बरसला. तुमसर, मोहाडी तालुक्यात गारपिटीने रबी पिकाला फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे. भंडारा शहरात सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. जवाहरनगर, लाखनी, पालांदूर, पवनी  व साकोलीतही पावसाने दमदार हजेरी लावली.तुमसर तालुक्यातील पवनारा येथे दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरूवात झाली. गारांचा पाऊस बरसला. परत सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. या पावसामुळे भाजीपाला पिकाला नुकसान झाल्याची माहिती आहे. मोहाडी तालुक्यातील मोहाडी शहर, उसर्रा, लोहारा, गायमुख, सोरणा, जांब व कांद्री, वरठी परिसरातही गारांसह पाऊस बरसला. या पावसामुळे टमाटर, मिरची, कोबी पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा गहू पिकाला  फायदा होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आंधळगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, आंधळगाव व परिसरात दुपारी मुसळधार पावसाला सुरवात झाली. गारपिटीचा तडाखा रबी पिकांना बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह भाजीपाला उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तुमसर तालुक्यात गारांसह पाऊसमंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी ३.३० च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. पावसासह गाराही पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मंगळवारी असलेल्या आठवडी बाजारातही नागरिकांची तारांबळ उडाली. शेतातील पिकांचेही नुकसान झाले. शहरातील सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले. तर काही घरात पाणी शिरले.मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारा व गारासह तुमसर शहर व तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे अधिक थंडी जाणवू लागली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी आकाशात ढगांनी गर्दी करून विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. तुमच्या शहरातील विनोबा भावे नगरात सखल भागात पाणी साचले होते तर काहींच्या घरात पाणी शिरले. तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याची माहिती आहे. तालुक्याच्या सीमेवरील काही गावात मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. अनेक शेतकऱ्यांच्या सध्या धानाचे चुरणे सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या धान हा शेतात ओला झाला. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. धान ओले होऊ नये म्हणून अनेक शेतकरी धावपळ करताना दिसले. फळबागा लागवड करणारे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी पुन्हा पावसाला सुरूवात झाली.

उघड्यावरील धानपोती धोक्यात- खरीप हंगामाची कामे वेळेवर आटोपली असली तरी धानाची खरेदी मात्र वेळेवर होवू शकली नाही. धान खरेदी केंद्र वेळेवर सुरू न झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे धान शेतशिवारात किंवा धान खरेदी केंद्र परिसरात पडून होते. आज आलेल्या दमदार पावसाने उघड्यावरील धानपोती धोक्यात आले आहेत. आधीच अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत असताना ओले झालेले धान शासन घेणार काय, असा सवालही उपस्थित झाला आहे. पाखर झालेल्या धानाची चवही कमी होत असल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडणार आहे.

धुसाळा येथे   बालकाचा मृत्यू- मोहाडी तालुक्यातील धुसाळा नवेगाव शेतशिवारात मेघगर्जनेसह पाऊस बरसला. यात आजोबांसोबत म्हशी चराईसाठी गेलेल्या नऊ वर्षीय नातवाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. नयन परमेश्वर पुंडे असे मृत बालकाचे नाव आहे. याचवेळी शेतात बांधलेल्या एक बैलही ठार झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली. नयन हा आंधळगाव येथील शाळेत इयत्ता तिसऱ्या वर्गाचा विद्यार्थी असल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती