शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का घसरला; १.५० लाख हेक्टरचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 11:18 IST

Bhandara : आतापर्यंत केवळ १६ हजार हेक्टरमध्ये पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामासाठी १.५० लाख हेक्टरमध्ये विविध पिकांची पेरणी करण्याचे नियोजन होते. परंतु, २ डिसेंबरपर्यंत केवळ १६ हजार १३० हेक्टर मध्येच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात उन्हाळी धानाचाही समावेश असतो. परंतु, सध्या धान लागवडीस अवकाश आहे. मात्र, आतापर्यंत भाजीपाला व मसाला पीक वगळता अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य या अंतर्गत सर्वसाधारण क्षेत्राचा विचार करता पीक पेरणी निम्म्यापेक्षाही कमी आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगाम खरीप आटोपल्यानंतर सुरू होते. परंतु, अद्यापही अनेक ठिकाणी शासकीय धान खरेदी सुरू झाले नाही. शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने काहींनी कर्ज काढून उधार, उसने घेऊन रब्बीची तजवीज केली. त्यातच महिनाभर विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. त्यामुळे मजूर मिळेनासे झाले होते. परिणामी रब्बीची पेरणी प्रभावित झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यंदा कृषी विभागाने रब्बी पिकांसाठी १.५० लाख हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन केले होते. तथापि, डिसेंबरच्या २ तारखेपर्यंत जिल्ह्यात फक्त १६१०३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात बागायती गहू २४४८ हेक्टर, मका २८६, ज्वारी २ हेक्टर, अशी अन्नधान्यांची २७३५ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. यंदाही सर्वाधिक हरभरा पिकाची लागवड झाली असून लागवडीचे क्षेत्र ४२५३ हेक्टर इतके आहे. लाख-लाखोरी २८५७ हेक्टर, मूग ९७६, उडीद ९८८, वाटाणा १८२५ पोपट ११८, मसूर २६८, बरबटी ४६, इतर कडधान्य ५ हेक्टर, अशी एकूण ११३०५ हेक्टरमध्ये लागवड झाली.

जवस १२९, मोहरी २२१, सोयाबीन २६६, करडई १४, तीळ २ हेक्टर, असे एकूण गळीत धान्याची ६३२ हेक्टरवर पेरणी झाली. टोमॅटो ८४, मिरची ११४, वांगी १६१, बटाटा ५, कारली २६, भेंडी ८८, कोबी ५१, चवळी ५२, पालेभाज्या ९४, इतर भाज्या ४०, असे मिळून भाजीपाल्याची एकूण ७१५ हेक्टरात लागवड झाली आहे. मसाला पिकांत धने ३५८, कांदा १२, मिरची १२३, असे ४९३ हेक्टर आहे. 

मामा तलाव व मध्यम प्रकल्प तुडूंबयंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने तलाव व प्रकल्पात सरासरी ८० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. ३२ लघु प्रकल्पात ७५ टक्के, २८ माजी मालगुजारी तलावात ८० टक्के तर ५ मध्यम प्रकल्पांत ९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पावसामुळे जमिनीत ओलावा असल्याने तुर्तास पाणी सोडण्याची मागणी झालेली नाही. मात्र, उन्हाळी धानासाठी पाण्याची गरज भासते. गरज भासल्यास अनेक शेतकरी विहिरी आणि बोअरिंगच्या माध्यमातूनच सिंचनाची सोय करतात. 

तालुकानिहाय लागवड क्षेत्र याप्रमाणे भंडारा - २४४५ हेक्टरमोहाडी - १९६९ हेक्टर तुमसर - ३४८ हेक्टर पवनी - ४०६२ हेक्टर साकोली - ८५४ हेक्टर लाखनी - १०८७ हेक्टरलाखांदूर - ५३३८ हेक्टर

टॅग्स :farmingशेतीRabiरब्बीbhandara-acभंडारा