५७ हजार हेक्टरवरील रबी पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 06:00 AM2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:39+5:30

जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५६ हजार १८८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. या क्षेत्राच्या १२८८ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची वाढ झाली आहे. आतापर्यंत ५७ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची लागवड झाली. यात सर्वाधिक हरभरा पिकाचा समावेश असून १७ हजार ५५० लागवड झाली आहे. गहू पिकांची ११ हजार ३२ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे.

Rabi crop on 57 thousand hectares threatened | ५७ हजार हेक्टरवरील रबी पीक धोक्यात

५७ हजार हेक्टरवरील रबी पीक धोक्यात

Next
ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : खरीपानंतर शेतकरी पुन्हा संकटात

देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सतत कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ५७ हजार ४७६ हेक्टरवरील रबी हंगाम धोक्यात आला आहे. गत तीन दिवसांपासून तर सारखा अवकाळी पाऊस बरसत आहे. गुरूवारच्या रात्री रात्रभर बरसलेल्या पावसाने शेतशिवारात सर्वत्र पाणी साचले होते.
जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५६ हजार १८८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. या क्षेत्राच्या १२८८ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची वाढ झाली आहे. आतापर्यंत ५७ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची लागवड झाली. यात सर्वाधिक हरभरा पिकाचा समावेश असून १७ हजार ५५० लागवड झाली आहे. गहू पिकांची ११ हजार ३२ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी रबी हंगामात गहू, हरभरा, वाटाणा, लाखोळी, मुग उडीद, सोयाबीन, जवस पोपट, भाजीपाला, भूईमुग, ऊस, मसूर, मोहरी, मिरची आदी पिकांची लागवड करीत असतात.
यावर्षीच्या खरीप हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. खरीप हंगामातील भर रबी हंगामात भरून निघावी यासाठी मोठ्या आशेने शेतकºयांनी रबी पिकांची पेरणी केली. कृषी विभागाने मात्र उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे प्रमाण आणि सिंचनासाठी आरक्षित पाण्याचा अंदाज घेऊन नियोजन केले होते. कृषी विभागाच्या नियोजनाला अवकाळी पावसाचा मोठा आधार झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने रबीच्या पेरणीला जवळपास महिनाभराचा विलंब झाला.
तथापि जमीनी पेरणीयोग्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. त्यातच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने गव्हाच्या पेरणीवर शेतकºयांनी भर दिला. भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यात ९ हजार ९६२.९६ सर्वसाधारण हेक्टरपैकी ७७४६.२८ हेक्टरमध्ये रबी पिकांची लागवड करण्यात आली आहे. याप्रमाणेच मोहाडी ६ हजार ८४६ हेक्टरपैकी ७०२३, तुमसर तालुक्यात ६ हजार २९० हेक्टरपैकी ५५२७.९० पवनी १४ हजार ९२८ पैकी १४,६१४.५०, साकोली ३३६२ हेक्टरपैकी ४३४४, लाखनी ६४१५.१० पैकी ६१८६.१५ तर लाखांदूर ८३८४ हेक्टरपैकी १२०३५ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली.
रबी पिके सुरुवातीला जोमात असताना शेतकऱ्यांची उत्पादनाची आशा वाढली होती. मात्र नोव्हेंबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत दोन-तीनदा अवकाळी पाऊस बरसत असल्याने रबी पिके संकटात सापडली आहेत.

कृषी विभागाचे उपाययोजनांकडे दुर्लक्ष
खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात मार्गदर्शन मिळाले नाही. रबी हंगामात शेतकºयांना लागवडीसंदर्भात जनजागृती करणे गरजेचे असताना केवळ कागदोपत्री घोडे नाचवून जनजागृतीचा ढिंढोरा पिटल्याचे शेतकरी सांगतात. रबी पिकांवर वातावरणाचा फटका बसत असून उत्पादनात कमालीची वाढ होण्याची शक्यताही कृषी विभाग सांगत आहे. मात्र उपाययोजना शून्य असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे.

रात्रभर बरसला पाऊस
भंडारा शहरासह जिल्ह्यात गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत पाऊस बरसत होता. दिवसभर ढगाळी वातावरण आणि पावसाच्या सरी कोसळत होत्या. रात्री ८ वाजताच्या सुमारास भंडारा शहरात पुन्हा जोरदार अवकाळी पावसाला सुरूवात झाली

Web Title: Rabi crop on 57 thousand hectares threatened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती