शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

रनेरा ते कर्कापूर नहर बांधकामावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:22 IST

पाटबंधारे विभागामार्फत रनेरा ते कर्कापूर दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या नहराच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

ठळक मुद्देमहसूल विभाग अनभिज्ञ : लिज रनेरा गावाची-मुरुम खनन हरदोलीतून

आॅनलाईन लोकमततुमसर : पाटबंधारे विभागामार्फत रनेरा ते कर्कापूर दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या नहराच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. चांदपूर जलाशयाला जोडल्या जाणाऱ्या नहराच्या कामात वापरण्यात येत असलेले मुरुम व सिमेंटच्या कामात नियमांचे उल्लंघन होत आहे.चांदपूर जलाशयात जोडल्या जात असलेल्या रनेरा ते कर्कापूर दरम्यानचा २ किमी अंतराचे नहर तयार करण्याची कामे सुरु आहे. त्या नहराच्या कामाची सुरुवात मे महिन्यात करण्यात आली होती. त्या कामाकरिता रनेरा येथील खाणीतून २०० ब्रास मुरुम खणनाची परवानगी देण्यात आली. मुरुम उत्खननाकरिता परवानगीच्या ठिकाणाहून उत्खनन न करता हरदोली येथील शेतकऱ्यांच्या शेतातून उत्खनन करण्यात आले. या कामात शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे. सदर नहराचे काम कर्कापूर हरदोली दरम्यान मुख्य वितरिकेतून बायपास करून रनेरा पर्यंत होत आहे. मुरुम उत्खननाचे लिजचे ठिकाण रनेरा गावातील तलावाचे व खणन मात्र हरदोली येथील शेतजमिनीतून झाल्यामुळे शासनाच्या महसूल विभागाची दिशाभूल करण्यात आल्याची तक्रार हरदोलीचे सरपंच नितीन गणवीर यांनी केली आहे. या प्रकारापासून महसूल विभाग अनभिज्ञ आहे. त्या नहर बांधकामाची अंदाजे रक्कम ४१ ला रूपये असून एकुण अंतर दोन कि.मी.चे आहे. कामाच्या ठिकाणी दर्शनी भागावर कसल्याच प्रकारचे फलक लावण्यात आले नाही.नहर कामाच्या पहिल्या टप्प्यात ८०० मीटर अंतरापर्यंत मुरुमाचे बेड पसरविण्याची परवानगी देण्यात आली. वितरिकेच्या कामादरम्यान मुरुम पसरविताना त्याची जाडी व सिमेंटीकरणाची जाडी नियमांप्रमाणे १० सेमी असणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात होत असलेल्या कामात तसे दिसून आली नाही. नहर बांधकामाची गुणवत्ता चाचणी, कॉम्पेक्शन चाचणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नहर बांधकामाचे शाखा अभियंता व उपविभागीय अभियंता हे पद एकाच अधिकाऱ्याकडे असल्यामुळे सदर कामाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे.नहर बांधकामात कंत्राटदाराकडून कोणत्याही प्रकारची अनियमितता होत असल्याचे निदर्शनास आलेले नाही. तसे असल्यास अभियंता या नात्याने सर्वस्वी जबाबदारी माझी राहील.- गंगाधर हटवार, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग, तुमसर.गत वर्षाच्या मे महिन्यात रनेरा गावचा पदभार माझ्याकडे नसल्यामुळे मला गौण खनिजाच्या लिजबद्दल माहिती नाही. मात्र कार्यालयाला विचारणा करूनच माहिती देण्यात येईल.- मनोज वरखडे, तलाठी, रनेरा.या कामात अनियमितता होत असून लिज रनेरा येथील असून उत्खनन हरदोलीतील शेतकºयांच्या शेतातून करयात आली. शासकीय नियमांची येथे पायमल्ली केली जात आहे.-नितीन गणवीर, सरपंच, हरदोली.