शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गृहप्रवेशाच्या दिवशीच तरुणावर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

शहरातील मुख्य मार्गावर दुकान थाटले. मोठा भाऊ प्रकाश त्याला मदत करीत होता. याच काळात घराचे कामही झाले. पुढील वर्षी लग्नाचा बेत असल्याने स्थळ पाहणे सुरु झाले होते. घरात राहायला जाण्यापूर्वी पूजा करण्याचे शनिवारी निश्चित झाले. सर्व साहित्य घरी आले. आनंदाचे वातावरण होते. विकासही नियमित वेळेवर उठला. सकाळी चहा - नाश्ता घेतला. पूजेसंदर्भात तयारीवर चर्चा करत असताना छातीत दुखायला लागली. त्याच्या अचानक हृदयविकाराचा झटका आला.

ठळक मुद्देवरठीची घटना । हृदयविकाराने झाला मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : लॉकडाऊनने रखडलेले घराचे बांधकाम कसेबसे पूर्ण केले. काटकसर करून डोक्यावर छत उभारले. पुढील वर्षी लग्न करण्याचा बेतही निश्चित झाला. भावी आयुष्याचे स्वप्न साकार होत होते. अशातच नवीन घरात जाण्याची तयारी सुरु झाली. गृहप्रवेशाच्या पूजेचे साहित्य घरी आले, सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना काळाने घाला घातला. शनिवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तरुणाचा हृदयद्रावक मृत्यू झाला.विकास सखाराम घरडे (३२) रा.नेहरु वॉर्ड वरठी असे मृत तरुणाचे नाव आहे. आपल्या आई व मोठ्या भावासोबत तो वरठीत राहत होता. मनमिळावू स्वभावाने तो सर्वांचा आवडता होता. चेहऱ्यावर सदैव हास्य असायचे.विकास येथील सनफ्लॅग कंपनीत कामावर होता. लॉकडाऊनमुळे काही दिवसापासून काम बंद होते. त्यामुळे त्याने महिनाभरापूर्वी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला. शहरातील मुख्य मार्गावर दुकान थाटले. मोठा भाऊ प्रकाश त्याला मदत करीत होता. याच काळात घराचे कामही झाले. पुढील वर्षी लग्नाचा बेत असल्याने स्थळ पाहणे सुरु झाले होते. घरात राहायला जाण्यापूर्वी पूजा करण्याचे शनिवारी निश्चित झाले. सर्व साहित्य घरी आले. आनंदाचे वातावरण होते. विकासही नियमित वेळेवर उठला. सकाळी चहा - नाश्ता घेतला. पूजेसंदर्भात तयारीवर चर्चा करत असताना छातीत दुखायला लागली. त्याच्या अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या मागे आई, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.भावी आयुष्याचे स्वप्न अपुर्णदरम्यान सकाळी ९ वाजता छातीत अचानक दुखायला लागले. लघुशंकेसाठी गेला आणि खाली कोसळला. घरच्यांनी तात्काळ उचलून घरात आणले. डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी तपासताच काळाने झडप घातल्याचे सांगितले. मात्र कुणाचाच विश्वास बसत नव्हता. आॅटोरिक्षा बोलावून भंडारातील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्याला दाखल करून घेण्यास काही रुग्णालयांनी नकार दिला. विकास आपल्यात नाही हे मान्य करायला घरचे तयार नव्हते. घराचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर भावी आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगणाºया विकासची अखेर प्राणज्योत मावळली. वरठीत हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाDeathमृत्यू