लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर धानाची प्रचंड आवक वाढल्याने गोदाम हाऊसफुल्ल झाले आहेत. परिणामी धानाची बहुतांश केंद्रावर खरेदी रखडली असून अनेक केंद्रांवर शेतकऱ्यांचा धान उघड्यावर आहे.दिवाळीपूर्वी धान शेतकऱ्यांच्या हाती आला असला तरी विक्रीचा वेग मात्र दिवाळीनंतर वाढला आहे. आधारभूत केंद्रावर योग्य वजन आणि भाव चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या रांगा आधारभूत केंद्रावर लागल्या आहेत. आॅनलाईन पद्धतीने नोंदणी केलेले शेतकरी नियोजित दिवशी आपला धान घेऊन आधारभूत केंद्रावर येत आहे. सुरुवातीला खरेदी सुरळीत झाली. परंतु आता धान साठविण्याचे गोदाम हाऊसफुल्ल झाल्याने धान खरेदी प्रभावित झाली आहे. भंडारा जिल्ह्यात ६७ आधारभूत केंद्रांना मंजुरी देण्यात आली. प्रत्यक्षात ५८ केंद्रावर धानाची खरेदी केली जात आहे. १७५० रुपये प्रतिक्विंटलने धान खरेदी होत आहे. मात्र आता पणन महासंघापुढे गोदामाचा प्रश्न निर्माण झाला आहे.धान साठविण्यासाठी गोदामे भाड्याने घेतली जातात. परंतु नियमित भाडे मिळत नसल्याने अनेक जण गोदाम देण्यास इच्छूक नसल्याचे दिसून येते.त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धान पोत्यांची रास लागली आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणची खरेदी थांबल्याने शेतकऱ्यांचा धान उघड्यावर आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत हा धान उघड्यावरच राहण्याची शक्यता आहे. उघड्यावरील धानाचे रक्षण करण्याची जबाबदारी शेतकºयांवर आली असून सर्व कामे सोडून आधारभूत केंद्रावर धान्याचे पोत्यांची राखण करावी लागत आहे.शेतकऱ्यांची आधारभूत केंद्रात जागलअनेक शेतकऱ्यांनी आपला धान आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी आणला आहे. परंतु खरेदी थांबल्याने धान उघड्यावर आहे. या धानाचे चोर आणि प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकºयांना जागल करावी लागत आहे. अनेक शेतकरी आता आधारभूत केंद्रात मुक्कामाने राहत असल्याचे दिसत आहे. याबाबत प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा आणि रखडलेली धानखरेदी सुरु करावी अशी मागणी आहे.
गोदामांअभावी रखडली धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 21:51 IST
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर धानाची प्रचंड आवक वाढल्याने गोदाम हाऊसफुल्ल झाले आहेत. परिणामी धानाची ...
गोदामांअभावी रखडली धान खरेदी
ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : आधारभूत केंद्रात धान उघड्यावर