शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आधारभूत केंद्रावर एक लाख 82 हजार क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

यावर्षी सुरूवातीपासूनच धान खरेदी शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना आधारभूत केंद्रावर वाईट अनुभव आले होते. अनेक शेतकऱ्यांना आठ आठ दिवस विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र यावर्षी तशी स्थिती येणार नसल्याचे दिसत आहे. आठवडाभरापुर्वी मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. 

ठळक मुद्देदहा दिवसात मिळणार चुकारे : अ ग्रेडच्या धानाची खरेदी निरंक

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत एक लाख ८२ हजार १९२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून त्याची किंमत ३४ कोटी तीन लाख ३५ हजार २७२ रुपये आहे. येत्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांना धानाचे चुकारे वितरित केले जातील, अशी माहिती आहे. जिल्ह्यातील ७३ धान खरेदी केंद्रावर आधारभूत किंमतीने खरेदी होत आहे. आधारभूत केंद्रावर खरेदी केलेला सर्व धान सर्वसाधारण ग्रेडचा असून अ ग्रेडच्या धानाची खरेदी निरंक आहे. जिल्ह्यात २९ ऑक्टोबरपासून धान खरेदीला प्रारंभ झाला असून ७९ केंद्रांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ७८ केंद्रांचे उद्घाटन झाले असून ७३ केंद्रावर खरेदी सुरू आहे. आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या एक लाख ८२ हजार क्विंटल धानामध्ये सर्वाधिक खरेदी लाखनी तालुक्यात ३९ हजार ७७५ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. भंडारा तालुक्यात १७ हजार ५३७ क्विंटल, मोहाडी २५ हजार ५०६ क्विंटल, तुमसर २२ हजार ४६५ क्विंटल, साकोली २८ हजार १८३ क्विंटल, लाखांदूर ३३ हजार ९९ क्विंटल, पवनी तालुक्यात १५ हजार ६२५ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाच हजार ९१५ शेतकऱ्यांनी आपला धान आधारभूत केंद्रावर विकला आहे. या धानाची किंमत ३४ कोटी तीन लाख ३५ हजार २७२ रुपये असून अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याला धानाचे चुकारे मिळाले नाही. आधारभूत किंमत १८६८ रुपये असून शासनाने ७०० रुपयाचा बोनस घोषित केला आहे. येत्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांना धानाचे चुकारे दिले जातील, असे सांगण्यात आले. यावर्षी सुरूवातीपासूनच धान खरेदी शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना आधारभूत केंद्रावर वाईट अनुभव आले होते. अनेक शेतकऱ्यांना आठ आठ दिवस विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र यावर्षी तशी स्थिती येणार नसल्याचे दिसत आहे. आठवडाभरापुर्वी मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यात धान खरेदी केंद्र वाढवून देण्याची सूचना करण्यात आली होती. पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांची संख्या वाढणार आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना यावर्षी धान विक्री करताना कोणत्याही अडचणी जाणार नाही. 

नवीन धान खरेदी केंद्र मंजुरी आचारसंहितेत अडकली  धान खरेदी केंद्रांना मंजुरीचे अधिकार १० नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेतील समितीला देण्यात आले आहे. या समितीत उपाध्यक्ष, जिल्हाधिकारी सदस्य म्हणून जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सदस्य सचिव म्हणून जिल्हा पणन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाची निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्यामुळे या समितीची बैठक झाली नाही. परिणामी नवीन धान खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली नाही. परंतु आचारसंहिता संपताच नवीन धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली जाणार आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत ७३ खरेदी केंद्रावर धान खरेदी केला जात आहे. मंजूर ७९ केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आधारभूत केंद्रावर कोणतीही अडचन नसून पुरेशाप्रमाणात बारदानाही आहे. येत्या आठ दहा दिवसात हमीभावानुसार धानाचे चुकारे केले जातील.-गणेश खर्चे,                           जिल्हा पणन अधिकारी भंडारा.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड