शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

१२८ केद्रांना खरेदीची मंजुरी, जिल्ह्यात ७६ हमीभाव केंद्र सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 14:07 IST

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट : पर्याप्त खरेदी केंद्रांअभावी हमीभाव मिळेना

युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात आता धानाची कापणी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक तर मळणीचे प्रमाणही ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. जिल्हा पणन महासंघाकडून जिल्ह्यात १२८ केंद्रांना धान खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यापैकी केवळ ७६ केंद्रांवर प्रत्यक्ष धान खरेदीला सुरुवात झाली असून, शुक्रवारपर्यंत १ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. अद्यापही पर्याप्त धान खरेदी केंद्र सुरू झालेली नसल्याने व्यापाऱ्यांचे फावत आहे.

यंदा धान खरेदी केंद्रांअभावी व्यापाऱ्यांना मोकळे रान आहे. पैशांची गरज असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांच्या दारात उभे राहात आहेत. शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा धान खरेदी करणाऱ्या खासगी व्यापाऱ्यांकडून घेतला जात आहे. मात्र, आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी हतबल आहे. यंदा शासनाने थानाला २ हजार ३२० रुपये हमीभाव जाहीर केला. या हमीभावापेक्षा कमी दराने धानाची खरेदी करणाऱ्या खासगी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार शासनाने बाजार समितीला दिले आहेत. परंतु, कुठेही कारवाई होताना दिसत नाही. 

वैधमापन यंत्रणा लक्ष देणार का?मोजमापात मोठ्या प्रमाणात 'पाप' होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच वाहन खर्च, मालाच्या प्रतीनुसार वेगवेगळे भाव व मोजमापासाठी लागणारा विलंब व कमी दरात धान खरेदी होत असल्याने शेतकरी कंगाल होत आहे. यंत्रणेकडून वजनकाटे व मापांची तपासणे गरजेचे आहे. 

खासगीच्या मापातही हातचलाखी व्यापारी आधीच धानाला भाव कमी देत असताना वजन काट्याच्या मोजमापातही हातचलाखी होत आहे. धान मोजणीसाठी काही ठिकाणी २५ किलो तर काही ठिकाणी ४० किलो मोजमाप केले जाते. वापरल्या जाणाऱ्या मापांबद्दल शेतकऱ्यांना शंका आहे.

केवळ नोंदणी, प्रत्यक्ष खरेदी केव्हा? जिल्ह्यात १२८ धान खरेदी केंद्रांना धान खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदणीची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, शासकीय धान खरेदी केंद्र मोजक्याच ठिकाणी सुरु झाली आहेत. त्यामुळे दौड महिन्यापासून शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ ऑनलाइन नोंदणीच करणार तर धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

आर्द्रतेच्या नावाखाली १५० रुपयांपर्यंत कपातजिल्ह्यात अद्यापही केंद्र सुरू होण्याची तारीख जाहीर नाही. परिणामी, खासगी व्यापाऱ्यांकडून धानाला २ हजारांचा दर दिला जात आहे. खासगी धान काट्यावर माल नेल्यावर आर्द्रतेच्या नावाखाली १०० ते १५० रुपयांची कपात होत असते. 

टॅग्स :bhandara-acभंडाराAgriculture Sectorशेती क्षेत्र