शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८ लाख क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

भंडारा जिल्हा धानउत्पादक जिल्हा आहे. १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आली. सध्या जिल्ह्यात ७४ केंद्र मंजूर असून प्रत्यक्षात ७३ केंद्रांवर खरेदी करण्यात आली आहेत. १ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत ८ लाख ६ हजार ६१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.

ठळक मुद्देसंडे अँकर । केंद्रावर असुविधा, ५६ कोटी रुपयांचे चुकारे थकीत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात आधारभूत खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली असून २६ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात ८ लाख ६ हजार ६१ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाची किंमत १४६ कोटी ३० लाख १ हजार ६९५ रुपये असून ९० कोटी ३७ लाख ८९ हजार ७७ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही ५५ कोटी ९२ लाख १२ हजार ६१७ रुपयांचे चुकारे बाकी आहेत. धान खरेदी केंद्रावरील असुविधांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे.भंडारा जिल्हा धानउत्पादक जिल्हा आहे. १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आली. सध्या जिल्ह्यात ७४ केंद्र मंजूर असून प्रत्यक्षात ७३ केंद्रांवर खरेदी करण्यात आली आहेत. १ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत ८ लाख ६ हजार ६१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात २४ हजार ३३५ क्विंटल, मोहाडी तालुक्यात ८२ हजार ७०० क्विंटल, तुमसर तालुक्यात १ लाख ५७ हजार ८२२ क्विंटल, लाखनी तालुक्यात १ लाख ४१ हजार ४७२ क्विंटल, साकोली तालुक्यात १ लाख ६२ हजार ३०२ क्विंटल, लाखांंदूर तालुक्यात १ लाख ७९ हजार ७९ क्विंटल आणि पवनी तालुक्यात ५८ हजार २९६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.या धानाची किंमत १४६ कोटी ३० लाख १ हजार ६९५ रुपये आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना ९० कोटी ३७ लाख ८९ हजार ७७ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. मात्र ५५ कोटी ९२ लाख रुपयांचे चुकारे अद्यापही बाकी आहेत.जिल्ह्यातील २३ हजार ६०९ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे. मात्र अद्यापही संपूर्ण शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळाले नाही. त्यातच बोनसमध्ये वाढ झाल्यानंतर धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. गोदामांचा अभाव आणि संथगतीमुळे शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.उच्चप्रतीचा धानही आधारभूत केंद्रावरसाधारण प्रतीच्या धानाला १८१५ रुपये आणि उच्च प्रतीच्या धानाला १८३५ रुपये आधारभूत किंमत आहे. ५०० रुपये बोनस आणि वाढीव २०० रुपये असे २५०० रुपये प्रतिक्विंटल रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांनी सर्वसाधारण म्हणजे जाड धान आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी आणला होता. मात्र बोनस घोषीत झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना उच्चप्रतीचा अर्थात बारीकधानही विक्रीसाठी आणला आहे. सर्वसाधारण धानाच्या किमतीत उच्चप्रतीच्या धानाची विक्री होत आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक उच्च प्रतीचा धान व्यापाऱ्यांनी खरेदी केला असून हाच धान आता आधारभूत केंद्रावर येत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड