जास्त दराने मिठाची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:00 AM2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:19+5:30

गावातील सुज्ञ नागरिकांनी लुबाडणूक करणाऱ्या किराणा दुकानदाराची तक्रार तहसीलदारांकडे केली आहे. नवेगावबांध येथील येरणे किराणा दुकानदार जास्त भावाने मिठाची विक्री करीत असल्याची माहिती मिळताच नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम, निरिक्षण अधिकारी काळे यांच्यासह नवेगावबांध पोलिसांनी किराणा दुकानाची तपासणी केली असता मिठाची विक्री जादा भावाने होत असल्याचे दिसून आले.

Punitive action against those who sell salt at high rates | जास्त दराने मिठाची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

जास्त दराने मिठाची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Next
ठळक मुद्देतालुका निरिक्षकांची ताकीद : नवेगावबांध येथील विक्रेता

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : मिठाचा तुटवडा भासवून बाजार मुल्यापेक्षा जास्त भावाने मिठाची विक्री केल्याप्रकरणी नवेगावबांध येथील किराणा दुकानदार रोहीत येरणे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढे असे झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी ताकीद तालुका पुरवठा निरीक्षक विनोद काळे यांनी दिली आहे.
गावातील सुज्ञ नागरिकांनी लुबाडणूक करणाऱ्या किराणा दुकानदाराची तक्रार तहसीलदारांकडे केली आहे. नवेगावबांध येथील येरणे किराणा दुकानदार जास्त भावाने मिठाची विक्री करीत असल्याची माहिती मिळताच नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम, निरिक्षण अधिकारी काळे यांच्यासह नवेगावबांध पोलिसांनी किराणा दुकानाची तपासणी केली असता मिठाची विक्री जादा भावाने होत असल्याचे दिसून आले. यामुळे येरणेवर दंडात्मक कारवाई करुन यापुढे मिठाची जास्त भावाने विक्री केल्यास कारवाई करण्यात येईल अशी ताकीद तालुका निरीक्षक काळे यांनी दिली.

Web Title: Punitive action against those who sell salt at high rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.