चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यात रस्ते निर्मितीच्या कामाला वेग आला असून मोठमोठ्या कंत्राटदार कंपन्यांकडून काम वेगात सुरु आहे. मात्र सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. धुळीच्या त्रासाने जनता वैतागली आहे.लाखनी शहरात फ्लॉयओव्हरचे काम शहरातील राष्ट्रीय महामार्गावर सुरु आहे. या महामार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. तीन महिन्यांपासून काम सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध फ्लॉयओव्हरसाठी खड्डे खोदणे सुरु आहे. तसेच केसलवाडा फाटा, तहसील कार्यालय चौक, बसस्थानक परिसरात कंपनीने खड्डे तयार केले आहे. त्याठिकाणी सुरक्षेचा अभाव आहे. सर्व्हिस रोडने वाहतूक सुरु केली नाही. शंभर फुटापर्यंतचे अतिक्रमण हटवून नालीचे बांधकाम पुर्ण केले नाही. परिणामी लाखनीतील सर्वसामान्य नागरिकांना वेढीस धरणे सुरु आहे. नागरिक अगदी जीव मुठीत घेवून रस्त्याने जातात. चौकाचौकात सुरक्षाकर्मचारी आहे. परंतु त्यानंतरही अपघाताची भीती कायम आहे.बसस्थानक परिसरात एका ट्रकने कारला धडक दिली. त्यात पत्रकार नरेश वंजारी थोडक्यात बचावले. असे अनेक प्रकार दररोज घडत आहे.यासोबतच लाखनी, लाखोरी, सालेभाटा, मोरगाव या राज्य मार्गाचे रुंदीकरण सुरु आहे. याठिकाणीही वाहतूक विस्कळीत झालेली दिसते. धुळीचा सर्वाधिक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.धुळीच्या त्रास होत असल्याने त्यावर पाणी मारणे आवश्यक आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनेही कंपनीने विचार केल्याचे दिसत नाही.- ज्ञानेश्वर रहांगडाले, जि.प. सदस्यशहरात फलॉयओव्हरचे काम सुरु आहे त्याची लांबी किती आहे. हे तहसीलदारांना माहित नाही. सर्व्हिस रोडचे काम पुर्ण केले नसतांना कामाला सुरुवात केली. प्रशासन व जनता अनभिज्ञ आहे.- आकाश कोरे, जि.प. सदस्य
रस्ते निर्मितीला जनता वैतागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:15 IST
तालुक्यात रस्ते निर्मितीच्या कामाला वेग आला असून मोठमोठ्या कंत्राटदार कंपन्यांकडून काम वेगात सुरु आहे. मात्र सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. धुळीच्या त्रासाने जनता वैतागली आहे.
रस्ते निर्मितीला जनता वैतागली
ठळक मुद्देधुळीचा त्रास : लाखनीत फ्लॉयओव्हर व राज्यमार्गाचे रुंदीकरण