शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर शहराला दररोज २९ लाख लिटर पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:38 IST

जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने जलसाठा झपाट्याने खाली जात आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र तुमसर शहर याला अपवाद ठरले आहे. नगरपरिषदेच्या उत्कृष्ट नियोजनाने भर उन्हाळ्यात शहराला दररोज २९ लाख पाणीपुरवठा केला जात आहे. वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा सुरू असून बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

ठळक मुद्देनगरपरिषदेचे नियोजन : भर उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा, वैनगंगा नदीत केले इन्टेकवेल

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने जलसाठा झपाट्याने खाली जात आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र तुमसर शहर याला अपवाद ठरले आहे. नगरपरिषदेच्या उत्कृष्ट नियोजनाने भर उन्हाळ्यात शहराला दररोज २९ लाख पाणीपुरवठा केला जात आहे. वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा सुरू असून बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर कवलेवाडा बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्याअनुषंगाने तुमसर नगरपरिषदेने पाणीपुरवठा करण्याची यशस्वी योजना तयार केली.स्थानिक स्वराज्य संस्थेचे नागरिकांना पाणीपुरठा करणे हे प्रथम कर्तव्य आहे. उपलब्ध पाणीसाठा व त्याचा योग्यविनियोग केला तर नागरिकांना उन्हाळ्यातही आवश्यक तेवढे पाणी पुरविता येते, हे तुमसर नगरपरिषदेने यशस्वी करून दाखविले. पाण्याची भीषण टंचाई असताना तुमसर नगरपरिषद दरदिवशी २९ लाख लीटर पाणीपुरवठा शहराला करीत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ११, ९ व सहामध्ये पाणीटंचाई आहे. तेथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. १२ टँकर उपलब्ध करून देण्यात आले असून दीड लाख लिटर पाणीपुरवठा होत आहे.शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात दोन जलकुंभ आहेत. त्यात १३ लाख व नऊ लाख लीटरचे जलकुंभ आहे. दुर्गा कॉलोनीत दीड लाख लीटर, बावनथडी कॉलोनीत अडीच लाख लीटर, नेहरू नगर दीड लाख लीटर, तिलकनगर दीड लाख लीटर जलकुंभ आहे. यातून दररोज एक तास पाणीपुरवठा होत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर कवलेवाडा बॅरेडमधून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग झाला. माडगी व कोष्टी येथे नगरपरिषदेने इन टच वेल तयार करून पात्रातून पाणी विहिरीजवळ वळते केले. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत झाला.४७ कोटींची पाणीपुरवठा योजनानगरोत्थान पाणीपुरवठा योजनेतून ४७ कोटींच्या योजनेचे तुमसर शहरात काम सुरू आहे. ५० टक्के काम झाले आहे. पुढील उन्हाळ्यापूर्वी १०० टक्के शहराला या योजनेतून पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे टँकरमुक्त शहर अशी ओळख तुमसर शहराची होणार आहे.तुमसर शहरात नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा सुरू आहे. भीषण तापमानामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. पुढीलवर्षी उन्हाळ्यापूर्वी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होऊन शहर टँकरमुक्त होणार आहे.-प्रदीप पडोळे, नगराध्यक्ष तुमसर.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई