शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वनालगत राहणाऱ्या ग्रामस्थांच्या हक्काचे रक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST

नॅशनल हायवे अ‍ॅथॉरीटी आॅफ इंडिया, नागपूर, महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण, नागपूर, ग्रामीण पाणीपुरवठा व सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय व जिल्हा परिषद स्तरावरील विविध विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., प्रधान मुख्य वन संरक्षक पी. एस. हांडा, मुख्य वन संरक्षक कल्याणकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड व गोंदिया उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.

ठळक मुद्देसंडे अँकर । नाना पटोले, विविध विभागाचा आढावा, वन हक्क पट्टे वाटप मेळावे लावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वन विभागामुळे रखडलेले विकास कामे वन विभाग व अन्य विभागाच्या अधिका?्यांनी समन्वयाने मार्गी लावावीत तसेच वनालगत राहणाऱ्या ग्रामस्थांच्या निस्तार अधिकाराचे रक्षण व्हावे, यासाठी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील वनालगत असलेल्या गावांमध्ये निस्तार रेषा आखण्यात यावी व हा कार्यक्रम कालबद्ध पद्धतीने तीन महिन्यात राबवावा असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.भंडारा गोंदिया जिल्ह्याचे विभाजन होऊन अनेक वर्षे झाले आहेत. भंडारा जिल्ह्याचे वन गोंदियाच्या ताब्यात आहे. या संबंधिचा प्रस्ताव सात दिवसात मंजूर करून वन भंडारा जिल्ह्याचे ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. त्याचप्रमाणे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न युध्दपातळीवर सोडवावे, अशा सूचना नाना पटोले यांनी दिल्या. साकोली उपविभागीय कार्यालयात वन व जलसंपदा विभागाच्या विविध विषयांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.नॅशनल हायवे अ‍ॅथॉरीटी आॅफ इंडिया, नागपूर, महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण, नागपूर, ग्रामीण पाणीपुरवठा व सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय व जिल्हा परिषद स्तरावरील विविध विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., प्रधान मुख्य वन संरक्षक पी. एस. हांडा, मुख्य वन संरक्षक कल्याणकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड व गोंदिया उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते. धापेवाडा टप्पा तीनचा प्रस्ताव २० दिवसांच्या सादर करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात यावा, असे ते यावेळी म्हणाले.गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, धापेवाडा योजना, पट्टे वाटप, घरकुलांसाठी रेतीची उपलब्धता, नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा व वन विभागामुळे रखडलेली विकास कामे इत्यादी विषयांचा आढावा नाना पटोले यांनी या बैठकीत घेतला.पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. झाशी नगर उपसा सिंचन योजना कॅनालला वनविभागाची मान्यता प्राप्त आहे. हा विषय मार्गी लावण्यासाठी स्टेट बोर्डची बैठक लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करायचे असून राज्य व केंद्र सरकारच्या परवानगीसाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.पाणी टंचाई समस्येवर भरउन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागली असून पाणी टंचाई जाणवू नये म्हणून पाणीपुरवठा योजना कालमर्यादेत पूर्ण करण्यात याव्यात. पाणीपुरवठा योजना तयार करत असताना नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होईल, याचे नियोजन त्यात अंतर्भूत असावे असे त्यांनी सांगितले. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील वनालगत असलेल्या गावांमध्ये निस्तार रेषा आखण्यात यावी व हा कार्यक्रम कालबद्ध पद्धतीने राबवावा असे निर्देश पटोले यांनी दिले. वन हक्क पट्टे वाटपाचे तालुकानिहाय मेळावे आयोजित करावे. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित लाभ सुद्धा सर्कलनिहाय मेळावे आयोजित करून तात्काळ वाटप करण्याच्या सूचना दिली. जिल्ह्यातील ११६ गावांच्या नळयोजनेच्या सर्व अडचणी तात्काळ पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी बुधवारला बैठक घ्यावी तसेच या विषयावर अंतिम बैठक ११ फेब्रुवारीला मुंबईत घेतली जाणार आहे

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले