भंडारा : जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करुन पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर असून या बाबत खा.नाना पटोले यांनी राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांचेशी मुंबई येथे भेट घेऊन चर्चा केली.जिल्ह्यात नागझिरा, नवेगावबांध, कोका अभयारण्य अशी अनेक पर्यटनस्थळ आहेत. पर्यटन स्थळांच्या विकासाकरिता निधी मंजूर करुन नविन प्रशासकीय कामांना मंजूरी देवून लवकरात लवकर पर्यटन विकास करावा. या पर्यटन विकासातून रोजगार उपलब्ध होवू शकतो. या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळू शकतो. प्रादेशिक पर्यटन विकासा संदर्भात खा.नाना पटोले यांनी राज्याचे पर्यटन विकास मंत्री रावल यांचेशी चर्चा केली. पवनी तालुक्यातील उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्प येथून मागील अनेक महिन्यांपासून ‘जय’ वाघ बेपत्ता आहे. जय हा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांचा केंद्र बिंदू असून आकर्षण होता. जय बेपत्ता असल्यापासून पर्यटकांची संख्या कमी झाली. या विषयावरसुध्दा खा.नाना पटोले यांनी पर्यटन विकास मंत्री रावल यांचेशी चर्चा करताना माहिती दिली. (नगर प्रतिनिधी)
पर्यटनातून रोजगार निर्मितीवर भरबैठक : नाना पटोले यांची पर्यटन विकासमंत्र्याशी चर्चा
By admin | Updated: April 30, 2017 00:26 IST