शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षानेच केली लाखोंची अफरातफर

By admin | Updated: November 29, 2015 01:35 IST

तालुक्यातील पुयार येथील सेवा सहकारी संस्थेचे सचिव आणि संचालक मंडळाची दिशाभूल करीत संस्थेच्या अध्यक्षानेच वसुली अंतर्गत लक्षावधी रकमेची अफरातफर केली.

प्रकरण पुयार संस्थेचे : अफरातफर रकमेपैकी नऊ लाख संस्थेला केले जमालाखांदूर : तालुक्यातील पुयार येथील सेवा सहकारी संस्थेचे सचिव आणि संचालक मंडळाची दिशाभूल करीत संस्थेच्या अध्यक्षानेच वसुली अंतर्गत लक्षावधी रकमेची अफरातफर केली. त्यानंतर संचालक मंडळाला पुरावे आढळून येताच हे बिंग बाहेर उघडकीस येऊ नये यासाठी संस्था अध्यक्षांनीच संस्थेकडे ९ लाख रूपयांची रक्कम जमा केली. मागील काही वर्षात संबंधित संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांनी संगनमताने १२ लाख रूपयाची अफरातफर केल्याचा आरोप संस्था संचालकांनी केला होता. याप्रकरणी संबंधित संचालकांनी जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार करून चौकशी करुन दोषीविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. या मागणीनुसार जिल्हा उपनिबंधकानी चौकशीचे आदेश दिले.या चौकशी सदर संस्थेत १२ लाख रुपयांची अफरातफर झाल्याचे उघडकीस आल्यानंतर संस्था अध्यक्ष मुनेश्वर कापगते यांनी अपरातफर रकमेपैकी फेरवसुलीअंतर्गत सबळ पुरावे संस्थेकडे मिळताच १६ आॅक्टोबर रोजी २ लाख रुपये, २७ आॅक्टोबर रोजी ३ लाख आणि १० नोव्हेंबर रोजी ४ लाख असे एकूण ९ लाख रूपये संस्थेकडे जमा केले. ही रक्कम फेरवसुलीत दाखविण्यात आली. सदर फेरवसूली रकमेचा भरणा लाखांदूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत पावती क्रमांक ६६३७०९, ६६३७३९ व ६६३७८७ नुसार जमा करण्यात आले आहे. मात्र या संस्थेअंतर्गत नेमकी किती लाख रुपयांची अफतफर झाली, हे सांगणे अधिकाऱ्यांनी टाळले. असे असले तरी अफरातफरीच्या रकमेपैकी आणखी फेरवसूलीची रक्कम शिल्लक असल्याचे सांगितल्याने संस्थेतील आणखी घबाड उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान या संस्थेअंतर्गत वसुली पावतीवरील संस्था अध्यक्षांला सह्या तसेच अपरातफर रकमेपैकी फेरवसूली रकमेच्या भरल्या पावतीवरील सह्या या संस्था अध्यक्षांच्याच असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी संस्था अध्यक्ष जबाबदार असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (तालुका प्रतिनिधी)