शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

नियमांच्या सावटात दुर्गोत्सवाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 05:00 IST

कोरोनावर मात करण्यासाठी मात करण्यासाठी शासनाने सणासुदीच्या काळात वेळोवेळी आदेश काढले आहे. गणेशोत्सव प्रमाणे दुर्गोत्सवासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ न देता हा उत्सव साजरा करण्यावर शासनाने भर दिला आहे. याशिवाय योग्य दिशा निर्देशांचे पालन करण्याच्या सूचनाही निर्गर्मित केल्या आहेत.

ठळक मुद्देया देवी सर्वे भूतेषू... : मंडळ करताहेत ऑनलाईन नोंदणी

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत तथा जगतजननी आई जंगदबेच्या नवरात्रोत्सवाला तीन दिवसांनी प्रारंभ होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव नियमांच्या सावटात साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी शेकडोच्या संख्येने दुर्गोत्सव मंडळातर्फे मूर्तीची स्थापना करण्यात येत असे, मात्र यावर्षी ही संख्या चांगलीच रोडावली आहे.कोरोनावर मात करण्यासाठी मात करण्यासाठी शासनाने सणासुदीच्या काळात वेळोवेळी आदेश काढले आहे. गणेशोत्सव प्रमाणे दुर्गोत्सवासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ न देता हा उत्सव साजरा करण्यावर शासनाने भर दिला आहे. याशिवाय योग्य दिशा निर्देशांचे पालन करण्याच्या सूचनाही निर्गर्मित केल्या आहेत.जिल्ह्यात दरवर्षी ३५० पेक्षा जास्त ठिकाणी माता दुर्गा तथा शारदा मातेची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंडळांनी उत्सव साजरा करण्यासाठी विचार केला आहे. मंडळ ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करीत असून आतापर्यंत १३ मंडळांनी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यासाठी तात्पुरती मंजूरी घेतली आहे. तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.मंडळांचे सामाजिक उपक्रमजिल्ह्यात दरवर्षी मोठ्या संख्येने मंडळाच्या वतीने दूर्गोत्सव साजरा केला जातो. भंडारा शहरातील गांधी चौकातील बालमित्र दूर्गोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण कार्यक्रमासह अन्य जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी कोरोना संकट काळात याचे स्वरूप थोडे बदलले असून आरोग्याशी निगडीत बाबींवर माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.पोलीस प्रशासनाचे नियोजनजिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दुर्गोत्सव साजरा केला जाणार असला तरी पुर्वीप्रमाणे ढोलताशे व फटाक्यांची आतशबाजी दिसणार नाही. महाप्रसाद वितरणावरही बंदी असून जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने बंदोबस्त लावण्यात आला आहे. यात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व पोलीस ठाणे हद्दीत पोलीस निरीक्षक उत्सवावर नजर ठेवणार आहेत.अशी आहे नियमावलीयेत्या १७ ते २५ आॅक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव होणार आहे. उत्सवात दुर्गादेवीच्या विविध रुपांच्या मूतीर्चे विशेष आकर्षण असते. दरवर्षी १० फुटापर्यंत उंचीच्या मूर्ती तयार केल्या जात होत्या, मात्र यावेळी ४ फुटापर्यंंत मूर्ती तयार करण्याच्या सूचना आहेत. यासोबतच फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व परिसर सॅनिटाईज करण्याचे स्पष्ट सांगितले आहे.शासनाने घालुन दिलेल्या नियमानुसार मंडळांनी नियोजन करावयाचे आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व परिसर स्वच्छ ठेवावा. पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.- वसंत जाधवजिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारागत ५५ वर्षांपासून दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली जात आहे. यावेळी नियमांना अनुसरून उत्सव साजरा केला जाणारा आहे. आरोग्याची विशेष म्हणजे घेण्यात येईल.- हेमंत नागरिकर, संयोजक,बालमित्र दुर्गोत्सव मंडळ, गांधी चौक भंडाराकोरोना संकटामुळे मूर्ती बनविण्याचे निम्मे ऑर्डर मिळाले आहेत. परिणामी उत्पन्नावर हमखास परिणाम जाणवला आहे. त्यातही साहित्यांचे दर वाढल्याने मेहनत जास्त पण उत्पन्न कमी, अशी स्थिती आहे.- सुरेश रूद्राक्षवारप्रसिद्ध मूर्तीकार,भंडारा

टॅग्स :Navratriनवरात्री