नियमांच्या सावटात दुर्गोत्सवाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 05:00 AM2020-10-14T05:00:00+5:302020-10-14T05:00:27+5:30

कोरोनावर मात करण्यासाठी मात करण्यासाठी शासनाने सणासुदीच्या काळात वेळोवेळी आदेश काढले आहे. गणेशोत्सव प्रमाणे दुर्गोत्सवासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ न देता हा उत्सव साजरा करण्यावर शासनाने भर दिला आहे. याशिवाय योग्य दिशा निर्देशांचे पालन करण्याच्या सूचनाही निर्गर्मित केल्या आहेत.

Preparations for Durgotsava in the wake of the rules | नियमांच्या सावटात दुर्गोत्सवाची तयारी

नियमांच्या सावटात दुर्गोत्सवाची तयारी

Next
ठळक मुद्देया देवी सर्वे भूतेषू... : मंडळ करताहेत ऑनलाईन नोंदणी

इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत तथा जगतजननी आई जंगदबेच्या नवरात्रोत्सवाला तीन दिवसांनी प्रारंभ होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव नियमांच्या सावटात साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी शेकडोच्या संख्येने दुर्गोत्सव मंडळातर्फे मूर्तीची स्थापना करण्यात येत असे, मात्र यावर्षी ही संख्या चांगलीच रोडावली आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी मात करण्यासाठी शासनाने सणासुदीच्या काळात वेळोवेळी आदेश काढले आहे. गणेशोत्सव प्रमाणे दुर्गोत्सवासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ न देता हा उत्सव साजरा करण्यावर शासनाने भर दिला आहे. याशिवाय योग्य दिशा निर्देशांचे पालन करण्याच्या सूचनाही निर्गर्मित केल्या आहेत.
जिल्ह्यात दरवर्षी ३५० पेक्षा जास्त ठिकाणी माता दुर्गा तथा शारदा मातेची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंडळांनी उत्सव साजरा करण्यासाठी विचार केला आहे. मंडळ ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करीत असून आतापर्यंत १३ मंडळांनी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यासाठी तात्पुरती मंजूरी घेतली आहे. तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

मंडळांचे सामाजिक उपक्रम
जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या संख्येने मंडळाच्या वतीने दूर्गोत्सव साजरा केला जातो. भंडारा शहरातील गांधी चौकातील बालमित्र दूर्गोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण कार्यक्रमासह अन्य जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी कोरोना संकट काळात याचे स्वरूप थोडे बदलले असून आरोग्याशी निगडीत बाबींवर माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

पोलीस प्रशासनाचे नियोजन
जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दुर्गोत्सव साजरा केला जाणार असला तरी पुर्वीप्रमाणे ढोलताशे व फटाक्यांची आतशबाजी दिसणार नाही. महाप्रसाद वितरणावरही बंदी असून जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने बंदोबस्त लावण्यात आला आहे. यात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व पोलीस ठाणे हद्दीत पोलीस निरीक्षक उत्सवावर नजर ठेवणार आहेत.

अशी आहे नियमावली
येत्या १७ ते २५ आॅक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव होणार आहे. उत्सवात दुर्गादेवीच्या विविध रुपांच्या मूतीर्चे विशेष आकर्षण असते. दरवर्षी १० फुटापर्यंत उंचीच्या मूर्ती तयार केल्या जात होत्या, मात्र यावेळी ४ फुटापर्यंंत मूर्ती तयार करण्याच्या सूचना आहेत. यासोबतच फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व परिसर सॅनिटाईज करण्याचे स्पष्ट सांगितले आहे.

शासनाने घालुन दिलेल्या नियमानुसार मंडळांनी नियोजन करावयाचे आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व परिसर स्वच्छ ठेवावा. पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
- वसंत जाधव
जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा

गत ५५ वर्षांपासून दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली जात आहे. यावेळी नियमांना अनुसरून उत्सव साजरा केला जाणारा आहे. आरोग्याची विशेष म्हणजे घेण्यात येईल.
- हेमंत नागरिकर, संयोजक,
बालमित्र दुर्गोत्सव मंडळ, गांधी चौक भंडारा

कोरोना संकटामुळे मूर्ती बनविण्याचे निम्मे ऑर्डर मिळाले आहेत. परिणामी उत्पन्नावर हमखास परिणाम जाणवला आहे. त्यातही साहित्यांचे दर वाढल्याने मेहनत जास्त पण उत्पन्न कमी, अशी स्थिती आहे.
- सुरेश रूद्राक्षवार
प्रसिद्ध मूर्तीकार,भंडारा

Web Title: Preparations for Durgotsava in the wake of the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.