शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

लाखनी शहरासह तालुक्यातही ठिकठिकाणी पाऊस बरसला. पालांदूरात सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. बदलत्या वातावरणामुळे आजारालाही खतपाणी मिळत आहे. सर्दी, पडसे, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. मोहाडी तालुक्यातील लोहारा (जांब), सोरणा परिसरात रिमझिम पाऊस बरसला. नाकाडोंगरी येथे ढगाळ वातावरण असतानाच पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

ठळक मुद्देगारठा वाढला : भंडारा शहरासह तुमसर, लाखनी, मोहाडीत पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अस्मानी संकटाने बळीराजाला चांगलेच पछाडले आहे. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच सोमवारी सकाळी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात रबी पिकांचे नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकांवरही संक्रांत आल्याने कीड व रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.भंडारा शहरात सकाळी ९ वाजताच्या सुमारास पाऊस बरसला. ढगाळ वातावरणामुळे पारा घसरला असतानाच पावसामुळे अधिकच गारवा निर्माण झाला. बंद झालेल्या शेकोट्या पुन्हा ठिकठिकाणी पेटलेल्या दिसल्या. या अवकाळी पावसाने रबी पिकाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे वैनगंगा नदीच्या तिरावरील गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांनाही फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.लाखनी शहरासह तालुक्यातही ठिकठिकाणी पाऊस बरसला. पालांदूरात सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. बदलत्या वातावरणामुळे आजारालाही खतपाणी मिळत आहे. सर्दी, पडसे, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. मोहाडी तालुक्यातील लोहारा (जांब), सोरणा परिसरात रिमझिम पाऊस बरसला. नाकाडोंगरी येथे ढगाळ वातावरण असतानाच पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.तुमसर येथे शहरासह तालुक्यात सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पाऊस बरसला. जवळपास एक तास पर्यंत पाऊस बरसल्याने वातावरणात चांगलाचा गारवा निर्माण झाला. थंडीचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी नागरिक शेकोटीचा आधारा घेत असल्याचे दिसून आले. रबी पिकांचे नुकसान झाले असून पुन्हा पाऊस बरसल्यास हातचे पीक जाणार की काय, अशी शक्यता व चिंताही बळीराजाने व्यक्त केली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांना ओलेचिंब व्हावे लागले. विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. पावसाचा सर्वात जास्त फटका नोकरदार व विद्यार्थ्यांना बसला. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.वारंवार पावसाने शेतकरी धास्तावलाजिल्ह्यात गत दिवाळीपासून वारंवार अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. सर्वाधिक नुकसान धान उत्पादक शेतकऱ्यांचे होत आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेला धान ओला होवून अंकूर फुटले होते. शेकडो शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आता पुन्हा अवकाळी पाऊस बरसत आहे. या पावसाचा फटका रबी पिकांना बसत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे. पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार कोसळणाºया अवकाळी पावसाची धास्ती जिल्ह्यातील शेतकºयांनी घेतली असून प्रशासन मात्र नुकसानभरपाईसाठी पुढाकार घेत नाही.

टॅग्स :Rainपाऊस