शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

शहरातील रस्त्यांवर खड्डे नव्हे तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

भंडारा शहरासह जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला. गत पंधरा दिवसात पडलेल्या पावसाने भंडारा शहरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्ते आता केवळ नावाला उरले असून खड्ड्यातून मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देनागरिक मेटाकुटीला : एकही रस्ता खड्डेमुक्त नाही, खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याने अपघाताची भीती कायम

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरात झालेल्या अतिवृष्टीने नगरपरिषदेच्या रस्त्यांचे पितळ उघडे पडले असून शहरातील एकही रस्ता खड्डेमुक्त दिसत नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर तर एवढे मोठे खड्डे पडले आहे की, त्याला तलावाचे स्वरुप आले आहे. पावसामुळे या खड्ड्यात साचलेल्या पाण्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहनधारकांसोबत नागरिकही चांगलेच मेटाकुटीला आले आहे.भंडारा शहरासह जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला. गत पंधरा दिवसात पडलेल्या पावसाने भंडारा शहरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्ते आता केवळ नावाला उरले असून खड्ड्यातून मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. एक खड्डा चुकवला की दुसऱ्या खड्ड्यात वाहन जात असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता त्रिमूर्ती चौक ते मुस्लिम लायब्ररी चौक हा होय. या रस्त्यावर जिल्हा बँकेच्या जवळ साधारणत: चार फुट रुंद खड्डा पडला आहे. रात्रीच्या अंधारात वाहनधारकांना हा खड्डा दिसत नाही. त्यामुळे वाहन उसळत आहेत. मुस्लिम लायब्ररी ते कॉलेज मार्गावर रस्ता नावालाच उरला आहे. या मार्गावरून विद्यार्थ्यांसह अर्ध्या शहरातील नागरिक जाणे येणे करतात. परंतु डागडुजीकडे अद्यापही कुणाचे लक्ष नाही.त्रिमूर्ती चौक ते बसस्थानक या रस्त्यावरही मोठाले खड्डे पडले आहेत. वाहनांची येथे सतत वर्दळ असते. पहिल्या दिवशी लहान असलेला खड्डा दुसºया दिवशी मोठा झालेला दिसतो. शास्त्री चौक ते खांबतलाव चौक मार्गावरील रस्त्याचीही अशीच अवस्था आहे. राजीव गांधी चौक परिसरात रस्ता निर्माणाधिन असून या भागात मोठाले खड्डे पडलेले आहेत. शहरातील सामाजिक न्याय भवनापासून शासकीय वसाहत मार्गे बसस्थानकाकडे जाणारा रस्ता तर अक्षरश: तलावाचे स्वरुप घेऊन आहे. मातीने माखलेल्या या रस्त्यावरून जाताना कुणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. किसान चौक ते देशबंधू वॉर्डाकडे जाणाºया रस्त्यावर तलावच दिसत आहे. पावसाचे पाणी यात साचून राहते. जिल्हा परिषद चौक ते गणेशपूर रस्त्याचीही अशीच अवस्था आहे. नवीन वसाहतीतील रस्त्याबाबत तर विचारायचीही सोय नाही. अनेक वाहनधारक आपली वाहने बाहेर दूर ठेवून चिखल तुडवत घरी जाताना दिसतात. नगरपरिषदेने या रस्त्यांची डागडुजी तात्काळ करावी अशी मागणी आहे.रस्त्यांची डागडुजी केव्हा?शहरातील प्रमुख मार्ग खड्ड्यांनी व्यापले आहे. या खड्ड्यांची दुरुस्ती केव्हा केली जाणार असा साधा सरळ प्रश्न नागरिक करीत आहेत. नगरपरिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु अद्याप नगरपरिषदेने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणत्याच उपाययोजना केल्याचे दिसत नाही. सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी खड्ड्यांमध्ये तात्पुरता का होईना मुरुमाचा भराव तरी टाकावा अशी मागणी होत आहे.गणेश उत्सवातही डागडुजीकडे दुर्लक्षशहरात गणेश स्थापनेपासून गणेश विसर्जनापर्यंत दहा दिवस उत्सव साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली होती. बाप्पांचे आगमन खड्डेमय रस्त्यावरून झाले आणि विसर्जन मिरवणुकही खड्डेयुक्त रस्त्यावरूनच काढावी लागली. गणेशोत्सवाच्या काळात नगरपरिषद या रस्त्यांची डागडुजी करेल अशी अपेक्षा होती, मात्र नगरपरिषदेने उत्सवाच्या काळातही डागडुजीकडे दुर्लक्ष केले. सतत पाऊस पडत असल्याने डागडुजीत अडथळा आल्याचे नगरपरिषद आता सांगत आहे. परिणामी रस्त्यांवर खड्डे आहेत.बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्यजिल्हा मुख्यालय असलेल्या बसस्थानकालाही खड्ड्यांनी सोडले नाही. बसस्थानकाच्या आवारात पाच ते सात फुटापर्यंतचे खड्डे पडले आहेत. सतत पाऊस पडत असल्याने या खड्ड्यात पाणी साचते. भरधाव बस आली की खड्ड्यांतील पाणी प्रवाशांच्या अंगावर उडते. त्यामुळे बाहेरगावी जाणाºया नागरिकांची कोंडी होते. बसस्थानकात दररोज शंभरावर बससेचे आवागमन होते. शहरासह जिल्हाभरातील नागरिक येथे बाहेरगावी जाण्यासाठी येतात. मात्र येथील खड्ड्यांनी मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाचे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक