शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे वाहन नवजात बाळासाठी झाले रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

वाहनचालक भूपेंद्र बावनकुळे यांना परिस्थिती सांगितली. त्यांनीही क्षणाचा विचार न करता कर्तव्यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ असे समजून थेट बाळ आणि बाळंतीणीला आपल्या वाहनात बसविले. काही वेळातच रुग्णवाहिका झालेले पोलिसांचे वाहन लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात पोहचले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून दुसऱ्या वाहनाने भंडारा येथे रुग्णालयात नेण्यात आले.

ठळक मुद्देचालकाची माणुसकी : बाळ-बाळंतीण सुखरूप, आरोग्य विभाग बेफिकीर

हेमंत मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : नेहमी आरोपींना पकडून ठाण्यात नेणाऱ्या पोलीस वाहनाला सोमवारी वेगळेच कर्तव्य पार पाडावे लागले. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने चालकाने चक्क नवजात बालकाला आपल्या वाहनातून थेट ग्रामीण रुग्णालयात पोहचविले. वेळेवर उपचार मिळाल्याने बाळ आणि बाळंतीण सुखरुप आहे. पोलिसांच्या या माणुसकीचे दर्शन लाखनी तालुक्यातील भागडी गावकऱ्यांना झाले. लाखनी पोलिसांच्या या कर्तव्याचे सर्वत्र कौतूक होत असताना आरोग्य विभागावर मात्र तेवढाच संताप व्यक्त करण्यात आला.लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील आरोग्य उपकेंद्रात सीमरण राहुल बोदेले या मातेने सोमवारी दुपारी ३.३० वाजता एका बाळाला जन्म दिला. मात्र जन्मताच बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे तेथे उपचार करणाऱ्या परिचारिकेच्या लक्षात आले. तीने बाळाला तात्काळ लाखांदुरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी रुग्णवाहिकेची शोधाशोध केली. परंतु रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे लक्षात आले. आता करायचे काय असा प्रश्न पडला असतानाच सावित्रीबाई फुले पुतळा अनावरणासाठी पोलिसांचे वाहन गावात आले होते. गावकऱ्यांनी तेथे धाव घेतली.वाहनचालक भूपेंद्र बावनकुळे यांना परिस्थिती सांगितली. त्यांनीही क्षणाचा विचार न करता कर्तव्यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ असे समजून थेट बाळ आणि बाळंतीणीला आपल्या वाहनात बसविले. काही वेळातच रुग्णवाहिका झालेले पोलिसांचे वाहन लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात पोहचले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून दुसऱ्या वाहनाने भंडारा येथे रुग्णालयात नेण्यात आले. अगदी वेळेवर पोलिसांचे वाहन मदतीला आले नसते तर मोठी अघटीत घटना घडली असती.चालक भूपेंद्र बावनकुळे यांनी खाकी वर्दीत लपलेली माणुकसकी जोपासली आणि त्यामुळे बोदेले परिवाराच्या वंशाच्या दिव्याला वेळेवर उपचार मिळाले. पोलिसांच्या या रुग्णसेवेचे सर्वत्र कौतूक होत आहे. तर दुसरीकडे ज्यांच्यावर खरी जबाबदारी आहे तो आरोग्य विभाग निद्रिस्त असल्याने संतापही व्यक्त होत आहे.आरोग्य सेवा सलाईनवरलाखांदूर तालुक्यातील आरोग्य सेवा सलाईनवर आल्याचे दिसत आहे. ग्रामीण रुग्णालयासह आरोग्य उपकेंद्रातही रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. आलेल्या प्रत्येक रुग्णाला भंडारा येथे रेफर करण्याची घाई तेथील अधिकारी व कर्मचाºयांना झालेली असते. रुग्णवाहिकाही वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे या आरोग्य सेवेला सलाईन लावून दुरुस्त करावे अशी मागणी आहे.

टॅग्स :Policeपोलिस