शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

चुलरडोह, आमगाव येथे पोलिसांची रनिंग हातभट्टी दारूवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 05:00 IST

दुसरी कारवाई सिहोरा पोलिसांनी तुमसर तालुक्यातील चुलरडोह येथे केली. या ठिकाणी अवैध दारु आणि मोहामाच जप्त करण्यात आला. मनोज ईश्वर मडावी (४५) रा.चुलरडोह याला ताब्यात घेण्यात आले. सिहोराचे ठाणेदार पवार यांनी आपल्या पथकासोबत ही कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी दिलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायाविरुद्ध मोहीम सुरु करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देमुद्देमाल जप्त : कारधा व सिहोरा पोलिसांची कारवाई

 लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ठाणेदारांचे खांदेपालट होताच नवीन ठाणेदारांनी अवैध व्यवसायाविरुद्ध मोहीम उघडली असून शुक्रवारी कारधा पोलिसांनी आमगाव नाल्यावर तर सिहोरा पोलिसांनी चुलरडोह येथे रनिंग हातभट्टीवर धाड मारली. मुद्देमालासह दारुविक्रेत्यांना अटक करण्यात आली.भंडारा तालुक्यातील आमगाव नाल्यावर हातभट्टीची दारु गाळली जात असल्याची माहिती कारधा पोलिसांना मिळाली. त्यावरुन ठाणेदार दीपक वानखेडे यांनी धाड टाकली. त्याठिकाणी मातीच्या चुलीवर लोखंडी ड्रममध्ये दारु गाळली जात असल्याचे दिसून आले. याठिकाणी पोलिसांनी सचिन माधोराव उके (२६) रा.आमगाव टोली याला अटक केली. तेथे मोहामाच व दारु गाळण्याचे साहित्य असे ४५ हजार ३५० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. दुसरी कारवाई सिहोरा पोलिसांनी तुमसर तालुक्यातील चुलरडोह येथे केली. या ठिकाणी अवैध दारु आणि मोहामाच जप्त करण्यात आला. मनोज ईश्वर मडावी (४५) रा.चुलरडोह याला ताब्यात घेण्यात आले. सिहोराचे ठाणेदार पवार यांनी आपल्या पथकासोबत ही कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी दिलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायाविरुद्ध मोहीम सुरु करण्यात आली आहे. 

लाखांदूर व मासळ येथे कारवाई लाखांदूर पोलिसांनी टाकलेल्या दोन धाडीत अवैध देशी दारु विक्रेत्यासह सट्टापट्टी व्यवसायीकाला अटक केली. नरेश पांडुरंग हरणे रा.मासळ आणि अजय यादवराव गुरनुले (४०) रा.लाखांदूर अशी आरोपींची नावे आहेत. नरेश हा मासळ येथे देशी दारुची अवैध विक्री करताना आढळून आला. त्याच्याजवळून १० नग देशी दारु पव्वे जप्त करण्यात आले तर अजय गुरनुले हा लाखांदुर येथे सट्टापट्टी घेत असल्याचे दिसून आले. त्याच्याजवळून रोख ५३२ रुपये जप्त करण्यात आले. कारवाई ठाणेदार मोहन कोरेटी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल कोकाटे. पोलीस नाईक राजेश शेंडे यांनी केली.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस