शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

..अन् हल्लेखोर रेती तस्कारांसोबत रंगली पोलिसांची सामिष पार्टी; व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 12:42 IST

या व्हिडीओत एका ढाब्यावर पार्टी सुरू असून पोलीस आपल्या कर्तृत्वाचा पाढा तस्कांरासमोर वाचत आहे.

ठळक मुद्देपोलीस म्हणतो, तुमसरला असताना उडविली अनेक आरोपींची नावे

भंडारा : उपविभागीय अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या रेती तस्कारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांची चक्क रेती तस्कारांसोबत सामिष पार्टी रंगलाच्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुमसर ठाण्यात असताना अनेक आरोपींची नावे उडविली, ही तर किरकोळ बाब आहे, असे, पवनी पोलीस ठाण्यात कार्यरत एक हवालदार रेती तस्करांना सांगताना दिसतो. ही पार्टी उमरेड जवळी एका ढाब्यावर बुधवारी दुपारनंतर झाल्याची माहिती आहे.

भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर बुधवारी पहाटे ३.३० वाजता १५ ते २० रेती तस्कारांनी हल्ला केला होता. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. पवनी पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले. मात्र त्यातील एक पथक चक्क रेती तस्कारांसोबत सामिष पार्टी करीत असल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका ढाब्यावर पार्टी सुरू असून पोलीस आपल्या कर्तृत्वाचा पाढा तस्कांरासमोर वाचत आहे.

आपण कशी मदत करतो हे तुम्हाल तर माहितच आहे. तुमसरमध्ये आरोपींची नावे उडवून टाकली होती. हे तर काहीच नाही, किरकोळ बाब आहे, असे सांगत थेट आयजींचे नाव घेतो. दिलीप घावडे असे पोलिसाचे नाव असून ते सहा महिन्यापूर्वी तुमसरवरून पवनी येथे बदलून आले होते. सध्या ते वाहतूक शाखेत कार्यरत आहे. या पर्टीत किशोर पंचभाई यांच्यासह एसडीओ हल्ला प्रकरणातील आरोपी राजू मेंगरे दिसत आहे. तर कोचे, लांबट हे पोलीस कर्मचारी ताव मारातना दिसत आहे.दोषींवर कडक कारवाई करा - आमदार नरेंद्र भोंडेकर

एसडीओंवर हल्ल्याचा प्रकार अत्यंत निंदनिय आहे. हल्लेखोर आरोपींचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करावी या मागणीचे पत्र आपण गृहमंत्र्यांना पाठविले आहे. रेती तस्करांची मोठी हिम्मत वाढत असून आता तर आरोपीला पकडायला गेल्या पोलिसांनी चक्क रेती तस्कारांसोबत पर्टी करीत आहेत. यावर मी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सर्व महिती देतो, असे आमदार नरेंद्र भोंडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbhandara-acभंडारा