शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यात चार जणांची नग्न धिंड काढणाऱ्या १७ आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:56 IST

जादूटोण्याच्या संशयावरून तालुक्यातील राजापूर येथे चौघांची नग्न धिंड काढून पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याच्या प्रयत्न करणाऱ्या १७ पुरूष आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी तर सात महिला आरोपींची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

ठळक मुद्दे राजापूरचे प्रकरणसात महिला आरोपी न्यायालयीन कोठडीत

भंडारा : जादूटोण्याच्या संशयावरून तालुक्यातील राजापूर येथे चौघांची नग्न धिंड काढून पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याच्या प्रयत्न करणाऱ्या १७ पुरूष आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी तर सात महिला आरोपींची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान गावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथकाने भेट दिली.

तुमसर तालुक्यातील राजापूर येथे शनिवारच्या रात्री चौघांची नग्न धिंड काढून माणुसकीला काळीमा फासण्यात आली होती. याप्रकरणी गोबरवाही पोलीस ठाण्यात कचरू राऊत यांनी तक्रार दिली. त्यावरून १७ पुरूष आणि सात महिलांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. रविवारी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली. दरम्यान सोमवारी या सर्व आरोपींना तुमसर येथील दिवानी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने १७ पुरूष आरोपींना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर सात महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

सदर घटनेचा तपास आता तुमसर येथील ठाणेदार रामेश्वर पिपरेवार यांच्याकडे देण्यात आला असून त्यांनीच या सर्व आरोपींना न्यायालयापुढे हजर केले होते. पोलीस कोठडी मिळालेल्या सर्व १७ आरोपींना तुमसर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहेत. कोठडीदरम्यान या घटनेत कोण सहभागी आहेत, याचा शोध पोलीस घेणार आहे. दरम्यान दुसऱ्याही दिवशी राजापूर गावात स्मशान शांतता दिसून आली. चौकाचौकांत पोलीस तैनात करण्यात आले आहे.अंनिसची चमू राजापुरात दाखलअंधश्रद्धेतून घडलेल्या या प्रकरणाची दखल घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एक चमू राजापूर येथे दाखल झाली. अंगात येणाºया संबंधित महिलेची भेट घेतली. तिच्या परिवाराचीही समजुत काढण्यात आली. या चमूने सदर महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची तयारी दर्शविली. मात्र कुटुंबियांची रुग्णालयात नेण्याची तयारीच दिसत नव्हती. अंनिसचे राहुल डोंगरे, कल्याणी भुरे, मनोज हुकरे, विजय केवट यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी