शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

कर्तव्यासह पोलिसांनी प्लाझ्मा दान करून जपले सामाजिक भान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 05:00 IST

कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे बाधित रुग्णांना प्लाझ्मा हा जीवनदान ठरणारा आहे. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान साठी पात्र असतात. टाळेबंदीच्या काळात पोलीस विभागाने अतिशय जोखमीचे कर्तव्य बजावले. त्यामुळेच भंडारा जिल्ह्यातील पोलीस विभागातील अनेक अधिकारी कर्मचारी  कोरोना पॉझिटिव्ह आले. या लोकांनी आपला प्लाझ्मा दान करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले होते.

ठळक मुद्दे५१ पोलिसांचा पुढाकार

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कायदा व सुव्यवस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या भंडारा पोलीस विभागाने कोरोना रुग्णासाठी जीवनदान ठरणारा प्लाझ्मा दान करण्यामध्येही पोलीस विभागाने पुढाकार घेऊन कर्तव्यासोबतच सामाजिक भान जपले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित प्लाझ्मा दान शिबिरात प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. पोलीस विभागाच्या या सामाजिक कार्याबद्दल जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी प्लाझ्मा दान करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे बाधित रुग्णांना प्लाझ्मा हा जीवनदान ठरणारा आहे. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान साठी पात्र असतात. टाळेबंदीच्या काळात पोलीस विभागाने अतिशय जोखमीचे कर्तव्य बजावले. त्यामुळेच भंडारा जिल्ह्यातील पोलीस विभागातील अनेक अधिकारी कर्मचारी  कोरोना पॉझिटिव्ह आले. या लोकांनी आपला प्लाझ्मा दान करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले होते. या आवाहनाला पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फुर्तपणे पुढाकार घेऊन ५१ च्यावर कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान करून विक्रम केला आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले. प्रत्येकच बाधित होऊन गेलेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा परिणामकारक ठरेल, याची श्वाश्वती नसल्याने प्रारंभी अशा व्यक्तींच्या शरीरातील आरबीडी व ॲण्टीबॉडीची तपासणी करण्यात येते. एका विशिष्ट पातळीपर्यंत याचे प्रमाण आढळल्यानंतर संबंधित व्यक्तीचा प्लाझ्मा उपयुक्त ठरू शकतो की नाही, याचे निदान केले जाते. दरम्यान प्लाझ्मा लक्षात घेता जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या कल्पनेतून प्लाझ्मा दान शिबिराची संकल्पना पुढे आली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि लाईफ लाईन रक्तपेढी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवस भंडाऱ्यात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पोलीस मोठ्या  प्रमाणात नोंदणी केली आणि मोठ्या संख्येने पोलीस प्लाझ्मा दानासाठी पात्र ठरले व त्यांनी प्लाझ्मा दान केला. पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम व प्रमोद डोंगरे यांनी यासाठी खूप मेहनत घेतली. उपजिल्हाधिकारी अर्चना यादव यांनी यासाठी उत्तम समन्वय साधला. तर लाईफ लाईन रक्त पेढीचे डॉ. हरीश वरभे व त्यांच्या चमुनी अतिशय नेटके नियोजन केले. 

प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन प्लाझ्मा दान शिबिर रविवारी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात असून नागरिकांनी आरबीडी व ॲण्टीबॉडीची तपासणी तपासणी करून  प्लझ्मा दान करण्याचे  आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. हा प्लाझ्मा शासकीय रुग्णालयात निशुल्क देण्यात येणार आहे.