शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
3
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
4
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
5
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
6
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
7
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
8
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
9
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
10
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
11
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
12
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
13
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
14
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
16
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
17
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
18
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
19
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
20
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

लग्न वऱ्हाडी बनून पोलिसांनी घातली रेतीघाटावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 23:35 IST

धाड टाकण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नामी शक्कल लढविली. खासगी वाहन भाड्याने घेतली. त्यांच्यार मॅरेज पार्टी असे फलक लावले. एवढेच नाही तर नवरदेवासाठी एक गाडीही सजविण्यात आली. या तीन वाहनात १५ अधिकारी पवनी तालुक्यातील कातखेडा घाटावर मध्यरात्रीच्या सुमारास पोहचले. लग्नाची वऱ्हात समजून रेतीमाफिये बेसावध होते. त्याचवेळी पोलिसांनी धाड टाकून दब्बल १२ टिप्पर आठ जेसीबी जप्त केले.

ठळक मुद्देखातखेडा रेतीघाट : दहा जणांना अटक, १२ टिप्पर, ८ जेसीबी जप्त

अशोक पारधी ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : जिल्ह्यात रेतीमाफियांनी धुमाकूळ घातला असून कारवाईसाठी गेलेले पथक दुरून दिसताच माफिये वाहनासह पसार होतात. त्यामुळेच पोलिसांनी आगळी वेगळी शक्कल लढवून रेतीघाटांवर धाड मारली. पोलीस चक्क लग्न वºहाडी होवून तालुक्यातील खातखेडा रेतीघाटावर पोहचले आणि दहा जणांना ताब्यात घेत १२ टिप्पर व आठ जेसीबी जप्त केल्या. या कारवाईने रेती तस्करांच्या पायाखालची वाळू मात्र सरकली.गत कित्येक महिन्यांपासून जिल्ह्यातील रेतीघाट बंद आहे. मात्र मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत आहे. हा प्रकार खुलेआम सुरू होता. परंतु कारवाईपुर्वीच रेती तस्कर पसार होत होते. त्यामुळे गुरूवारी जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात बैठक घेण्यात आली. धाड टाकण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नामी शक्कल लढविली. खासगी वाहन भाड्याने घेतली. त्यांच्यार मॅरेज पार्टी असे फलक लावले. एवढेच नाही तर नवरदेवासाठी एक गाडीही सजविण्यात आली. या तीन वाहनात १५ अधिकारी पवनी तालुक्यातील कातखेडा घाटावर मध्यरात्रीच्या सुमारास पोहचले. लग्नाची वऱ्हात समजून रेतीमाफिये बेसावध होते. त्याचवेळी पोलिसांनी धाड टाकून दब्बल १२ टिप्पर आठ जेसीबी जप्त केले. टिप्पर चालक-मालक दहा जणांना अटक करण्यात आली. अटकेतील माफियांकडून माहिती मिळून काही जणांना अटक केली जाणार आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. याप्रकरणी पवनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे अधिक तपास करीत आहे.धाबे दणाणलेपोलिसांनी नामी शक्कल लढवून रेती घाटावर धाड टाकल्याची माहिती शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यात पसरली. त्यामुळे जिल्ह्यातील विविध रेतीघाटावर तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अनेक रेतीतस्करांनी आपले खबरे पोसले आहेत. परंतु या खबऱ्यांनाही अशा नामी शक्लीमुळे अंदाज आला नाही आणि जिल्हा पोलिसांची रेती तस्कराविरूद्ध धाड यशस्वी झाली.पोलिसांनी केलेल्या कारवाईत परसराम महादू महादे रा. सोनेगाव, लिखिराम बस्तीराम शेंडे रा. बिडगाव, दीपक मधुकर शेंडे रा. कळमना नागपूर, शरद देविदास कुरूडक रा. डोंगरगाव, मेनसिंग मंगलसिंग खंडाते रा. नागपूर, स्वप्निल नत्थूजी मांढरे रा. पाचगाव, शिशिर निलकंठ झाडे रा. टाकळी नागपूर, लियाकत अली मुबारक अली रा. नागपूर, नौशाद रहमतुल्ल खान रा. खरबी नागपूर यांना अटक करण्यात आली असून दहा चालक पसार झाले आहे.

टॅग्स :Policeपोलिसsandवाळू