शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचा लाठीमार

By admin | Updated: September 30, 2015 00:46 IST

शहरातील बजरंग गणेशोत्सव मंडळाने काढलेल्या विसर्जन मिरवणुकीवर शहर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

भंडारा बंदचे आवाहन : दोषी पोलिसांविरुद्ध कारवाईची मंडळाची मागणी, पाठीवर व्रण येईस्तोवर तरुणांना बदडलेभंडारा : शहरातील बजरंग गणेशोत्सव मंडळाने काढलेल्या विसर्जन मिरवणुकीवर शहर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेच्या निषेधार्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारला दुपारी १ वाजता पोलीस ठाण्याला घेराव करुन दोषी पोलिसांविरुद्ध कारवाईची मागणी केली.भंडारा बंदचा इशारातत्पूर्वी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषद घेऊन पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध केला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी बुधवारला भंडारा शहर बंदचे आवाहन केले आहे. यावेळी ते म्हणाले, मंगळवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बजरंग गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात निघाली. मिरवणूक महालाजवळ आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे संकटमोचक मंदिरात हनुमंताच्या मूर्तीसमोर हनुमान चालिसाचे पठण सुरु असतानाच काही पोलिसांनी तरुणांना धमकविणे सुरु केले. पोलिसांकडून बेदम मारहाणकाही कळायच्या आतच पोलिसांनी कार्यकर्त्यांना लाठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा लाठीमार का केला जात आहे, हे विचारण्यासाठी काही ज्येष्ठ कार्यकर्ते गेले असता त्यांच्यावरही लाठीमार करण्यात आला. कार्यकर्ते जिवाच्या आकांताने जात असताना पोलिसांनी त्यांना पकडून पकडून बदडले. या लाठीहल्ल्यात दश माटूरकर, हर्षल कुंभारे, चेतन पाटील, वैभव बांते, हरीष हुकरे, प्रणय कुथे, संकेत मते, शुभम माटूरकर, मिलिंद डुंभरे, बंटी अले, जय पटेल या तरुणांच्या पाठीवर लाठीचे बेदम व्रण आहेत. याशिवाय उषा सरसाळे, सुमन डुंभरे, आरजु करंडे, तुलसी पटेल या महिलांनाही पोलिसांनी बेदम मारहाण केली.यावेळी गणवेशात नसलेल्या पोलिसांनी बँडपथकातील तरुणांनाही बदडून वाद्य हिसकावून घेतले. पोलीस एवढ्यावरच न थांबता घरात शिरुन मारहाण केली. पोलिसांनीच कार्यकर्त्यांना सूचना न देता गणपती मूर्तीचे विसर्जन केले. त्यामुळे ही पोलिसांची सुनियोजित प्रयत्न होता, असा आरोपही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याप्रकरणी दोषी पोलिसांना निलंबित करुन न्याय देण्याची मागणी महिला व पुरुषांनी केली.संघटनांनी नोंदविला निषेधबजरंग गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारच्या घटनेचा भंडारा जिल्हा विकास मंचचे जिल्हाध्यक्ष आबिद सिद्धीकी यांनी निषेध नोंदविला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)अनंत चतुर्दशीला विसर्जनाची गरजराज्यात सर्वत्र अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन करण्याची पद्धत आहे. मात्र भंडारा या एकमेव जिल्ह्यात तिथी गेल्यानंतर पितृपक्षात विसर्जन करण्याचा पायंडा आहे. महानगराच्या तुलनेत या जिल्ह्यात सार्वजनिक गणपती कमी आहेत. असे असताना एकाच दिवशी विसर्जन पद्धत असती तर कदाचित ही वेळ आली नसती. त्यामुळे प्रशासनासह गणपती मंडळांनीही पुढच्या वर्षीपासून अनंत चतुर्दशीलाच विसर्जन करण्याची परंपरा जपली पाहिजे.