शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

मजुरांना नेणारे पिक अप वाहन उलटले, एकाचा मृत्यू, १५ जखमी

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 6, 2024 13:56 IST

मोहाडी तालुक्यातील टोकावर असलेल्या करडी / पालोरा या गावापासून येथून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या पॉवर हाऊस जवळ मजुरांना कामावर घेऊन जाणारे पिक अप वाहन उलटले.

भंडारा : मोहाडी तालुक्यातील टोकावर असलेल्या करडी / पालोरा या गावापासून येथून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या पॉवर हाऊस जवळ मजुरांना कामावर घेऊन जाणारे पिक अप वाहन उलटले. यात एका मजुराचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर १५ जखमी झाले. सर्व जखमींवर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता हा अपघात घडला.

मृत मजुराचे नाव ज्ञानेश्वर तुकाराम शेंद्रे (६०) असून भंडारा येथे उपचारासाठी पाठवलेल्या गंभीर जखमीचे नाव राकेश आंबेडहारे असे आहे. तर, जखमींमध्ये सुरेश फत्तु गजभिये (२८), कैलास लक्ष्मण शेंद्रे (३२), हिरालाल हनु भानारकर (४५), नरेंद्र कीसन धुर्वे (४२), राजकुमार नारायण बावनथळे (४२), राकेश ज्ञानेश्वर आकरे (४०), मुकेश दुधराम रामटेके (२८), शेखर पांडू नेवारे (३२), प्रमोद रामा नागोसे (३५), धनराज जैराम बावनथडे (३२), भिमराव जैराम बावनथडे (४०), रामेश्वर सुधारक नेवारे (२६), विजय राजीराम बावथडे (४८), विश्वास तुळसिदास रामटेके (२७) यांचा समावेश आहे. हे सर्व मजूर साकोली तालुक्यातील उसगाव येथील आहेत. करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी निषा पांडे यांनी प्राथमिक उपचार करून या सर्वांना पुढील उपचारासाठी तुमसरला रवाना केले.

तिरोडा तालुका विहीरगाव यथे सुरू असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावर हे सर्वजण ठेकेदारी मजूर होते. सकाळी ७:३० वाजता ते सर्वजण पिक अप वाहनातून (क्रमांक एमएच ३६ / एए ३१२८) कामावर निघाले होते. दरम्यान, करडी गावाजवळील पॉवर हाऊसजवळ अचानकपणे वाहनचालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे पिक अप उलटला. हा प्रकार लक्षात येताचा गावकरी धाऊन आले. त्यांनी सर्व जखमींना गावच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले.

गावकऱ्यांनी केली मदतअपघाताची माहिती कळताच करडी येथील सरपंच निलीमा ईलमे व माजी सरपंच महेंद्र शेंडे यांच्यासह गावकरी मदतीला धावून आले. नागरीकांच्या मदतीने सर्वांना करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यासाठी मोठी धावपळ केली.करडीचे पोलिस निरीक्षक विलास मुंडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन भंभीर जखमी असलेल्या दोघांना आपल्या वाहनातून तुमसरला पाठविले. वाहन चालक रंजित केसर रामटेके (४०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वाहन पोलिसात जमा करण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात