शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

लॉकडाऊनमध्ये पाळीव जनावरांची चिकित्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा हा दुग्ध उत्पादनासाठी विदर्भात प्रथम क्रमांकावर आहे. शेळी व कुक्कुट पालनाचा स्वतंत्र व्यवसाय स्विकारून येथील शेतकऱ्यांनी उपजिविकेचे साधन निर्माण केले आहे. त्यामुळे आपल्या जनावरांच्या आरोग्याची काळजी पशुपालक आपल्या घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे घेतात, हे विशेष. अशातच कोरोनाने देशावर संकट ओढविल्याने सर्वत्र लॉकडाऊन आहे.

ठळक मुद्देपशुपालकांच्या मदतीला पशुवैद्यक : जनावरांचे लसीकरण, शस्त्रक्रीया, गर्भधारण व वंधत्व तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामासाठी बाहेर जाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. नागरिकांना घरीच राहा, सुरक्षित राहा असा सल्ला देत आरोग्य विभाग त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत आहे. अशाच संकटसमयी पशुवैद्यकीय विभागाने फिजीकल डिस्टेन्सींगचे पालन करून जिल्ह्यातील पाळीव जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली आहे. तसेच पशु उपचारासोबतच वन्यजीवांचे औषधोपचार करणे व इतर बाबतीत वन्य विभागास सुद्धा मदत करीत आहेत.भंडारा जिल्हा हा दुग्ध उत्पादनासाठी विदर्भात प्रथम क्रमांकावर आहे. शेळी व कुक्कुट पालनाचा स्वतंत्र व्यवसाय स्विकारून येथील शेतकऱ्यांनी उपजिविकेचे साधन निर्माण केले आहे. त्यामुळे आपल्या जनावरांच्या आरोग्याची काळजी पशुपालक आपल्या घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे घेतात, हे विशेष. अशातच कोरोनाने देशावर संकट ओढविल्याने सर्वत्र लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामासाठी नागरिकांना बाहेर पडण्यावर निर्बंध घातल्यात आहे. या संकटसमयी काळात पाळीव जनावरांकरिता औषधोपचाराची चिंता शेतक-यांना भेडसावत असताना जिल्ह्याचा पशुवैद्यकीय विभाग पशुपालकांच्या मदतीला देवदूत म्हणून धावून आलेला आहे. पशुपालकांच्या जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत आहेत. भंडारा जिल्ह्यात ८५ पशुवैद्यकीय संस्था कार्यरत आहेत. या सर्व संस्थेतील पशुवैद्यक पशुपालकांना आपल्या दवाखाण्यामार्फत पशुंची चिकित्सा करून सेवा देत आहेत. लॉकडाऊनच्या काळात गत वर्षीपेक्षा यावेळी पशुवैद्यकी विभागाच्या तांत्रिक कार्यात वाढ झालेली आहे. जिल्हाभरात पशुचिकित्सेमध्ये लसीकरण, औषधौपचार, शस्त्रक्रिया, गर्भधारणा वंधत्व तपासणी करण्यात येत आहे. तसेच पशु उपचारासोबतच वन्यजीवांचे औषधोपचार करणे व इतर बाबतीत वन्य विभागास सुद्धा मदत करीत आहेत.अत्यावश्यक सेवेतून पशुपालकांची सेवासध्या देशावर कोरोनाचे संकट आहे. या संकटाचा सामना प्रत्येकाला करावा लागतो आहे. गाव असो की शहर प्रत्येकाला या संकटसमयी काळात सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकरी या देशाचा कणा आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकरी, पशुपालकांमुळे दुग्धजण्य पदार्थाची अत्यावश्यक सेवा नागरिकांना पुरविल्या जात आहे. अशावेळी पशुपालकांना पशुवैद्यकीय विभागाकडून पशुचिकित्सेची सेवा पुरविणे आमचे कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रीया जिल्हा पशसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके यांनी दिली. संकटसमयी प्रत्येक वेळी, शेतकरी, पशुपालक हा नागरिकांच्या पाठीशी उभा असतो. पशुपालकांच्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य जिल्हाभर करीत आहोत. पशु उपचारासोबतच वन्यजिवांचे औषधोपचार करणे व इतर बाबतीत वन्य विभागास मदत करीत आहेत. पशुसवंर्धन विभागातील माझे अधिकारी, कर्मचारी पशुपालक व वनविभागास अत्यावश्यक सेवा देत आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक