शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
2
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
3
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
4
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
5
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
6
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
7
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
8
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
9
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
10
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
11
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
12
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
13
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
14
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
15
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
16
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
17
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
18
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
19
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
20
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात

धान पिकावर कीडींचा प्रादुर्भाव

By admin | Updated: August 18, 2016 00:26 IST

जिल्ह्यात धान पीकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

कृषी विभागाच्या उपाययोजना : धान पिकावरील कीड व रोगांचे व्यवस्थापन वेळीच कराभंडारा : जिल्ह्यात धान पीकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. पावसाची दीर्घ उघड व बांधीत पाणी नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असताना कीडीचा प्रकोप त्यांच्या मानगुटीवर बसला आहे. शासन प्रशासनाने कीटकनाशक औषधींचा शेतकऱ्यांना पाठपुरावा करावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. कीडींचा बंदोबस्त वेळीच करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.लष्करी अळीचा पतंग मध्यम आकाराचा १ ते २ से.मी. लांब असून समोरील पंख पिंगट व त्यावर काळसर ठिपका व कळेवर नागमोडी पट्टे असतात. पूर्ण वाढलेली अळी २.५ अड्याळ ते ४ से.मी. लांब, लठ्ठ, मऊ, हिरवी आणि अंगावर लाल पिवळसर उभ्या रेषा असतात. मादी २०० ते ३०० अंडी समुहाने, पुंजक्यांच्या स्वरुपात धानावर तसेच गवतावर घालते. अंडी करड्या रंगाच्या केसांनी झाकलेले असतात. अंडी अवस्था ५ ते ८ दिवस, अळी अवस्था २० ते २५ दिवस व कोषा अवस्था १० ते २५ दिवसांची असून कोष धानाच्य बुंध्याजवळील बेजक्यात तसेच जमिनीत आढळतात. लष्करी अळींची एक पिढी पूर्ण होण्यास ३० ते ४० दिवस लागतात. लष्करी अळीचे प्रादुर्भाव झालेल्या साकोली तालुक्यातील किन्ही एकोडी या गावाची पाहणी जिल्हा वरिष्ठ भात पैदासकार जी.आर. शामकुवर, कीटकशास्त्रज्ञ डॉ.बी.एन. चौधरी, अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.नलिनी भोयर, उपविभागीय कृषी अधिकरी बी.एन. सांगळे, तालुका कृषी अधिकारी जी.के. चौधरी, कृषी अधिकारी के.एम. बोरकर या चमुने केली.बांधी स्वच्छ ठेवणे, अळींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास चुडात किंवा जमिनीवर दिसणाऱ्या अळ्या, गोळा करून नष्ट कराव्या. धानाच्या बांधीत पाणी साठवून ठेवून पिकावरून दोर किंवा झाडाच्या फांद्या आडव्या फिरवून लष्करी अळ्या पाडाव्यात, लष्करी अळीचे नियंत्रणासाठी डायक्लोरव्हास ७६५ इसी, १२.५० मिली, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.खोडकिडा नियंत्रणासाठी शेतात ५ टक्के कीडग्रस्त फुटवे दिसताच क्विनॉलफॉस ३२ मिली, प यती १० लिटर पाणी या प्रामणात मिसळून फवारावे. अथवा ट्रायकोग्रामा जॅपोनिकम हे परोपजीवी कीटक हेक्टरी ५० हजार या प्रमाणात दर ७ दिवसाचे अंतराने ४ ते ४ वेळा सोडावे.गादमाशी नियंत्रणासाठी गादमाशी प्रवण क्षेत्रात रोवणीनंतर १० आणि ३० दिवसांनी तर इतर क्षेत्रात ५ टक्के, चंदेरी पोंगे इतका प्रादुर्भाव आढळताच दाणेदार फोरेट १० टक्के १० किलो अथवा क्विनॉलफॉस ५ टक्के १५ किलो प्रती हेक्टरी बांधीमध्ये ७ ते १० सेंमी. (३ ते ४ इंच) पाणी असताना टाकावे. बांधीतील पाणी चार दिवसपर्यंत बांधीबाहेर काढून ये. अथवा गराडीचे पाने १.५० टन प्रती हेक्टर या प्रमाणात चिखलणीचे वेळी शेतात टाकावीत. यामुळे तुडतुडे आणि खोडकिडींचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो. तुडतुडे नियंत्रणासाठी नत्र खताची वाजवीपेक्षा जास्त मात्रा वापरू नये. प्रत चुड ५ ते १० तपकीरी तुडतुडे दिसतात इमिडॅक्लोप्रीड १७.८ एस.एल. २.२ मि.ली. किंवा फिप्रोनिल ५ मि.ली. किंवा थायोमिथोक्झाम २५ डब्लू.जी. २ ग्रॅम किंवा मिलथिआॅप ५० टक्के प्रवाही २० मि.ली. किंवा फेन्थोएट ५० टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १४ मि.ली. यापैकी एक किटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अथवा म्युकर हिमॅलीस किंवा मेटा हायझियम अ‍ॅनोसोपली ही जैविके २.५० किलो प्रतीहेक्टर या प्रमाणात द्यावीत. देण्यापूर्वी बांधीतील पाणी काढून टाकावे, अशा उपाययोजना कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)