शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

श्रमदानातून साकारला ग्रामस्थांनी पांदण रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 00:23 IST

तालुक्यातील विहीरगाव बुराड्या येथील नागरिकांनी लोकसहभागातून दळणवळणासाठी पांदन रस्ता तयार केला.

विहीरगाव येथील प्रकार : अन्य गावांसमोर ठेवला आदर्शसाकोली : तालुक्यातील विहीरगाव बुराड्या येथील नागरिकांनी लोकसहभागातून दळणवळणासाठी पांदन रस्ता तयार केला. यात लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून कोणतीही मदत घेण्यात आली नाही. गावकऱ्यांच्या या अभिनव उपक्रमाचा सर्वस्तरातून कौतूक करण्यात येत आहे.साकोली तालुक्यातील सानगडीपासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावर असलेल्या विहिरगाव (बु.) हे छोटेसे गाव. चुलबंद नदीकाठावर वसलेल्या व धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या येथील लोकांचे मुख्य व्यवसाय म्हणजे पारंपारिक शेती व शेतीवरील मजुरी हे आहे. मात्र राजकीय अनास्थेपायी या गावाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष केले आहे. या गावालगत चुलबंद नदी असल्याने रेतीमाफियांनी आपले बस्तान मांडले. त्यामुळे सानगडी ते विहिरगाव या ३ कि.मी. डांबरी रस्त्यावर दिवसरात्र रेती चोरी ट्रॅक्टरच्या वाहतुकीचा जड वाहनांचा मारा पडत असल्याने या मजबूत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आधीच अरुंद रस्ता त्यावर खड्यांचे साम्राज्य अत्यंत जीवघेणे खड्डे असतानाही दळणवळणाची जीवदायी ठरणाऱ्या या रस्त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेकडो एकर शेती काही वर्षापूर्वीया पांदन रस्त्याचे काम झाले होते. परंतु त्यानंतर दुर्लक्ष झाल्याने या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे झाडे झुडपे वाढले. शेतकऱ्यांना शेतात जाताना जीव मुठीत घेऊन कसरत करावी लागत होती. मागणी करून अपेक्षा पूर्ण होत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनी निर्णय केला की आपणच श्रमदानातून पांदन रस्ता दुरुस्त करायचा. यासाठी विकास बनकर, वासुदेव बनकर, पुरुषोत्तम बनकर, बाळकृष्ण बनकर, अभय वाचलकर, गोपाल बनकर, विलास इरामे, सेवक इरले, कैलाश इरले, बंडू इरले, राजेश इरले, टेकराम उपरीकर, नलू मानकर, गीता नेवारे, सुशीला नेवारे, सुखदेव नेवारे, सुरेश उपरीकर, विनोद सुरजबंशी, दीपक उपरीकर, गणेश नगरकर, दुधराम वडीकार, केशर गायधने यांनी श्रमदान करून पांदन रस्ता साफ केला. हंसराज नगरकर यांचे २ आणि मुरलीधर बनकर यांचा १ अशा ३ ट्रॅक्टरने ९० ट्रीप गिट्टी, रेती, माती व मुरुम आणून रस्ता मजबूत केला. या रस्ता शासनाने जर तयार केला असता तर जवळपास ७ ते १० लक्ष रुपये खर्च झाला असता. परंतु गावकऱ्यांनी कुठलीही अपेक्षा न करता सदर पांदन रस्ता मजबूत केला. त्यामुळे या रस्त्यावरील शेतकरी आता रात्रीही बेधडक शेताची पाहणी करण्यास जातात. या पांदन रस्त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रेखा वासनिक, सरपंच हरिभाऊ बनकर, चुन्नीलाल वासनिक यांचे मार्गदर्शन लाभले. मात्र विहिरगाववासीयांचा हा प्रयत्न आदर्श ठरला आहे. (तालुका प्रतिनिधी)