शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

रुग्णांचा आहार महागला

By admin | Updated: January 6, 2015 22:54 IST

विदर्भातील ११ जिल्हयात असलेल्या १३ रुग्णालयातील रुग्णांना अन्न पुरवठा करणाऱ्या स्वयंपाकगृहाचे खासगीकरण करण्यात आले. यामुळे पूर्वीच्या ६४ रुपये प्रति थाली ऐवजी ७४ रुपये प्रतिथाली

रुग्णालयातील स्वयंपाकगृहाचे खासगीकरण : आता द्यावे लागणार ७४ रुपयेभंडारा : विदर्भातील ११ जिल्हयात असलेल्या १३ रुग्णालयातील रुग्णांना अन्न पुरवठा करणाऱ्या स्वयंपाकगृहाचे खासगीकरण करण्यात आले. यामुळे पूर्वीच्या ६४ रुपये प्रति थाली ऐवजी ७४ रुपये प्रतिथाली याप्रमाणे नविन कंत्राट देण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना दिल्या जाणारे अन्न महाग झाले आहे. यामुळे शासनावर अतिरिक्त भार पडणार आहे. रुग्णालयातील रुग्णांसाठीचे स्वयंपाक गृह कंत्राटी पध्दतीने चालविण्याबाबत राज्याचे आरोग्य संचालकांतर्फे आदेश काढण्यात आला आहे. विदर्भातील ११ जिल्हयातील रुग्णालयातील रुग्णांना दोन वेळचे जेवण, नास्ता व चहा पुरविण्यासाठीचे तीन वर्षाचे कंत्राट वर्धा येथील विदर्भ युवक स्वयंरोजगार सेवा सहकारी सोसायटी यांना देण्यात आले. विदर्भातील भंडारा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर अमरावती, खामगांव महिला रुग्णालय, अकोला, नागपूर, अमरावती, बुलढाणा, वाशिम आदी ठिकाणी असलेल्या जिल्हा सामान्य रुगणालयातील स्वयंपाकगृहाचे खासगीकरण करण्यात आले आहे. पूर्वी स्वयंपाकगृहात शिजलेले अन्न रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून रुग्णाच्या बेडपर्यंत वाटप केले जात होते. मात्र कंत्राटीपध्दतीनंतर रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना जेवण पुरविण्यास मनाई करण्यात आली. शासनाने दिलेल्या निकषानुसार १०० ग्रॅम पोळी, १०० ग्रॅम भात, ७० ग्रॅम तूर डाळ, १२५ ग्रॅम भाजी पुरविल्या जाते. हे निकष कंत्राटदारासाठीही कायम ठेवण्यात आले. शिवाय रुग्णांना जेवण देण्यापूर्वी तपासणी केली आहे. या संस्थेमार्फत ११ जिल्हयात प्रतिनिधी नेमून रुग्णालयात २५ डिसेंबरपासून रुग्णालयात मोफत जेवण पुरविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. एक, दोन रुग्णालय वगळता प्रत्येक जिल्हयात जिल्हा सामान्य रुग्णालयात शासनाने स्वतंत्रपणे प्रक्रिया सुरु झाली आहे.प्रत्येक जिल्हयात जिल्हा सामान्य रुग्णालयात पुर्वी शासनाने स्वतंत्रपणे विचार करुन रुग्णांना जेवण देत होते. त्यावेळी प्रति थालीचा शासकीय दर ६४ रुपये निश्चित होता. शिवाय स्वयंपाक तयार करणारे शासकीय कर्मचारी असल्याने त्यांना पगार देण्यात येत होता. मात्र स्वयंपाकगृहाचे खासगीकरण केल्याने रुग्णालयात स्वयंपाकी म्हणून काम करणारे कर्मचारी अतिरिक्त ठरले. (नगर प्रतिनिधी)