शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी वितरिकेला फोडून स्वत:च्या शेतापर्यंत तयार केली पाटचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST

बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाची वितरिका कारली-चिचोली शिवारातून जाते. सन २००७ मध्ये या वितरिकेचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु तांत्रिक कारणामुळे येथील परिसरातील शेतशिवारात सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नव्हता. प्रथमच सन २०१९ मध्ये उन्हाळी धान पिकाला शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी वितरित करण्यात आले होते.

ठळक मुद्देचिचोली शिवारातील प्रकार : प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी प्रकल्पाची वितरिका फोडून एका इसमाने स्वमालकीच्या शेतापर्यंत कच्ची वितरिका तयार करून सिंचनाकरीता पाणी वळते केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तालुक्यातील कारली-चिचोली वितरिकेवरील हा प्रकार चिचोली शिवारात घडला.बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाची वितरिका कारली-चिचोली शिवारातून जाते. सन २००७ मध्ये या वितरिकेचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु तांत्रिक कारणामुळे येथील परिसरातील शेतशिवारात सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नव्हता. प्रथमच सन २०१९ मध्ये उन्हाळी धान पिकाला शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी वितरित करण्यात आले होते.चिचोली शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात वितरिकेचे पाणी जात नसल्याने त्याने वितरिका फोडून स्वत:च्या शेतापर्यंत मातीची वितरिका तयार करून घेत पाणी पोहचविले आहे. शासन नियमानुसार कोणतीही पूर्वसूचना न देता वितरिकेला फोडणे हा गुन्हा आहे. संंबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. वितरीका फोडणाऱ्या सदर इसमावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.बावनथडी प्रकल्प पूर्ण झाल्याने सिंचनाकरिता शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे. सदर शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत नियमानुसार शासनाने वितरिका तयार करण्याची गरज होती.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी