लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) २०१६ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेत भंडाऱ्याचा निखिल सुरेश बोरकर हा राज्यात ८२५ रँकने उत्तीर्ण झाला आहे. हा निकाल बुधवारी घोषित झाला. या परीक्षेत यावर्षी भंडाऱ्यातून उत्तीर्ण झालेला निखिल एकमेव आहे. अन्य दोन उमेदवारांची रॅकिंग हुकली.निखील सुरेश बोरकर हे न्यु फेंडस कॉलनी खात रोड भंडारा येथील रहिवासी असून त्याचे प्राथमिक शिक्षण भंडाऱ्यात तर पाचवीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय नवेगावबांध येथे झाले. बारावीनंतर ईलेक्ट्रिकल शाखेत अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या निखिलने प्रशासकीय सेवा परीक्षेसाठी दिल्ली येथे तयारी सुरू केली. २०१६ च्या पहिल्या प्रयत्नात देशात ८२५ वी रँक त्यांना मिळाली. निखीलचे वडील गोंदिया जिल्हा बँकेत कार्यरत असून त्याची बहीण प्रणाली रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया मुंबई येथे कार्यरत आहे. या प्रयत्नात आयएएससाठी पात्र ठरलो नसलो तरी त्यासाठी पुन्हा जोमाने अभ्यास करून परीक्षा देणार आहे, असल्याचे निखिल बोरकर यांनी सांगितले.
युपीएससीत भंडाऱ्याचा निखील बोरकर उत्तीर्ण
By admin | Updated: June 2, 2017 00:25 IST