शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

प्रवाशांना वाटतो बसस्थानक असुरक्षित

By admin | Updated: April 16, 2015 00:22 IST

परीक्षा संपल्यामुळे शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे इतर गावाला जाण्यासाठी प्रवाशांच्या संख्येत

प्रवाशांमध्ये महामंडळाविरुद्ध रोष : भंडारा बसस्थानकात असुविधा, नियमित पोलीस बंदोबस्ताची गरजभंडारा : परीक्षा संपल्यामुळे शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे इतर गावाला जाण्यासाठी प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रवाशांची गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सोयी सुविधा पुरवणे आवश्यक आहे; परंतु यासेवा पुरविण्यात एसटी महामंडळ प्रशासन अपयशी ठरल्याचे मंगळवारी ‘लोकमत’ने प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्व्हेक्षणात आढळून आले. वाढत्या भुरट्या चोऱ्या, पाकिट बेपत्ता होणे अशा विविध कारणामुळे बसस्थानक परिसर असुरक्षित बनल्याचे प्रवाशांच्या चर्चेअंती दिसून आले. सुट्यांमुळे बसने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ पाहता राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यात येतात का? या अनुषंगाने ‘लोकमत’ने मंगळवारला सर्व्हेक्षण केले. सर्व्हेक्षणादरम्यान भंडारा बस स्थानकावरील सोयी सुविधांबाबत प्रवाशांचे मत जाणून घेतले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचे वास्तव समोर आले. बसने प्रवास करणे किती सुरक्षित आहे, याबाबत विचारले असता, ६५ टक्के प्रवाशांनी एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याचे सांगितले. २२ टक्के प्रवाशांना एसटीचा प्रवास असुरक्षित वाटतो. आपत्कालीन परिस्थितीत बसमध्ये प्रथमोपचार सुविधा मिळत नसल्याचे ७५ टक्के प्रवाशांनी, तर बसची स्थिती पाहून प्रथमोपचार सुविधेबाबत विचारले असता २५ टक्के प्रवाशांनी मिळत नसल्याचे सांगितले. याशिवाय बस स्थानकावर उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत विचारले असता ४५ टक्के प्रवाशांनी समाधानी नसल्याचे सांगितले. बसचे वेळापत्रक पाळले जाते कां? या प्रश्नावर ६२ टक्के प्रवाशांनी होय, तर ३८ टक्के प्रवाशांनी नाही, असे उत्तर दिले. प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा व सुरक्षेच्या बाबतीत राज्य परिवहन महामंडळ किती सज्ज आहे, हे वास्तव सर्व्हेक्षणातून समोर आले. पोलीस सुरक्षेबाबत समाधानी आहात कां? या प्रश्नावर १२ टक्के प्रवाशांनी पोलीस सुरक्षा असल्याचे सांगितले, तर पोलीस सुरक्षा नसल्याचे ८८ टक्के प्रवाशांचे मत आहे. यासंदर्भात प्रवाशांची मते विचारात घेतले असता भंडारा बसस्थानक परिसरात चोरटे वाढले असून अनेक प्रवाशांचे पाकिट बेपत्ता होतात. त्यामुळे पोलीस सुरक्षा चोख करण्यात यावी, अशा अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या दिवसात अपघाताची शक्यता बळावली आहे. अशा परिस्थितीत अपघात झाल्यास प्रवाशांच्या उपचारासाठी प्रथमोपचार असणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी सांगितले.(लोकमत चमू)चोरटे मस्त; पोलीस सुरक्षा सुस्त