शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

शिक्षक समाज व्यवस्थेचा कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:01 IST

उत्कृष्ठ मार्गदर्शन आणि आपल्या सखोल अभ्यासातून लहान मुलांच्या जीवनाला आकार देण्याचे काम शिक्षक करतात. त्यांच्या मार्गदर्शनातून भावी पिढी तयार होत असून भारतीय समाज व्यवस्थेला दिशा देण्याचे कार्य शिक्षकाच्या माध्यमातून सुरु आहे. शिक्षक हा समाज व्यवस्थेचा कणा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले.

ठळक मुद्देरमेश डोंगरे। भंडारा येथे जिल्ह्यातील ११ आदर्श शिक्षकांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारतीय समाज व्यवस्था शिक्षणावर टिकून आहे. थोरपुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास त्यात शिक्षणाचे महत्व लक्षात येते. जीवनात शिक्षणाचे अनन्य साधारण आहे. ही जबाबदारी शिक्षकांनी उचलली आहे. उत्कृष्ठ मार्गदर्शन आणि आपल्या सखोल अभ्यासातून लहान मुलांच्या जीवनाला आकार देण्याचे काम शिक्षक करतात. त्यांच्या मार्गदर्शनातून भावी पिढी तयार होत असून भारतीय समाज व्यवस्थेला दिशा देण्याचे कार्य शिक्षकाच्या माध्यमातून सुरु आहे. शिक्षक हा समाज व्यवस्थेचा कणा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले.शिक्षण विभाग जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, समाजकल्याण सभापती रेखा वासनिक, महिला व बालकल्याण सभापती रेखा ठाकरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रेमदास वनवे, जिल्हा परिषद सदस्य नीलकंठ कायते, साकोलीच्या सभापती रोषणा नारनवरे व शिक्षणाधिकारी आर. एस. काटोलकर उपस्थित होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी शिक्षकाची जबाबदारी आणि कार्य याबाबत बोलताना अनेक उदाहरण दिले. शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांनी त्यांच्या जीवनातील प्रसंग सांगून यशस्वी जीवनात शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे यश गाठल्याचे सांगितले. यावेळी जिल्ह्यातील ११ शिक्षकांचा सत्कार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. प्राथमिक विभागातून ७, माध्यमिक विभागातून तीन व एक विशेष शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. प्राथमिक विभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साहुलीच्या अनिता रहांगडाले, पेंढरीचे ज्ञानेश्वर लांडगे, सातोनाचे माधवी नंदनवार, नेरलाचे रामभाऊ गेडाम, वाडेगांव प्रेमलाल हातझाडे, पुयारचे डेव्हिडकुमार गजभिये, हसाराचे अशोक ठाकरे आणि माध्यमिक विभागातून अंबिर वंजारी, संदीप वहिले व बाळू चव्हाण व विशेष शिक्षक म्हणून रवींद्र फन्दे यांचा समावेश आहे.प्रास्ताविक डी. पी. वाघाये व आभार पी. डी. गणवीर यांनी मानले. कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी राजभोज भांबोरे व विनायक वंजारी उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षक