भंडारा : स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जे विद्यार्थी स्पर्धेत विजयी झाले त्यांच्या स्वच्छतेच्या कार्यात नेहमीच सहभाग असावा. त्यांच्यामार्फत स्वच्छतेचा संदेश ग्रामस्तरावर पोहचविण्यासाठी नेहमी तत्पर असावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांच्या वतीने जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचे बक्षिस वितरण व गटसमन्वयक यांच्यासाठी ग्रामस्तरावर प्रचार व प्रसिद्ध करिता आयईसी टूल किट प्रशिक्षण जिल्हा परिषद सभागृह येथे पार पडले. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सभापती अरविंद भालाधरे, महिला व बालकल्याण सभापती रेखा भुसारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एच. आडे उपस्थित होते. प्रास्ताविक एच.एच. आडे यांनी केले. अरविंद भालाधरे यांनी अशा स्पर्धा ग्रामपंचायतीमध्ये व्हायला हव्या तरच ग्रामपंचायतीचा विकास झपाट्याने होऊ शकतो, असे मत मांडले. वंदना वंजारी यांनी गावाचा विकास होईल तेव्हाच देशाचा विकास संभव आहे, असे सांगितले. अतिथींच्या हस्ते कनिष्ठ व वरिष्ठ गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय स्पर्धकांना धनादेश, मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. २५ सप्टेंबर ते २३ आॅक्टोबर १४ दरम्यान राबविण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय चित्रकला, निबंध व वकृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांनाही यावेळी मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गटसमन्यवक यांचे साहित्याच्या माध्यमातून ग्रामस्तरावर प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी आईईसी टूल किट प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणामध्ये पी.एस. बिसेन यांनी प्रचार प्रसिद्धी करण्याकरिता आयईसी टूलकिटचा वापर करावा हे प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. तसेच मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभणे, आईसी सल्लागार राजेश्वर येरणे, आईसी तज्ज्ञ निलीमा जवादे यांनी टूलकिटवर मार्गदर्शन करून प्रशिक्षणादरम्यान गटसमन्यवक समूह समन्वयक यांनी आईसीई टुलकिटचे सादरीकरण केले. संचालन अजय गजापुरे तर आभार डी.एस. बिसेन यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
स्वच्छता कार्यात सहभाग असावा
By admin | Updated: March 13, 2015 00:43 IST