शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

आजपासून अंशत: अनलाॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट ७.६७ टक्के असून ऑक्युपाइड ऑक्सिजन बेड ४.४१ टक्के आहे. ज्या ठिकाणी पाॅझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरले आहे, तेथे पहिल्या टप्प्याचे निकष लागू होणार आहेत; परंतु भंडारा जिल्ह्यात भरलेले ऑक्सिजन बेड कमी असले तरी पाॅझिटिव्हिटी रेट कमी असल्याने तो तिसऱ्या टप्प्यात लागत आहे. 

ठळक मुद्देभंडारा जिल्हा लेव्हल ३ मध्ये : व्यापारी प्रतिष्ठाने ७ ते ४ पर्यंतच

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता हळूहळू अनलाॅकची प्रक्रियाही सुरू झाली आहे. राज्य शासनाने ठरविलेल्या निर्देशांनुसार भंडारा जिल्हा तिसऱ्या लेव्हलमध्ये असून आज, सोमवारपासून अंशत: अनलाॅक केले जात आहे. यात आता व्यापारी प्रतिष्ठाने सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्प्यांचे निकष घोषित करण्यात आले असून, या निकषांनुसार भंडारा जिल्हा तिसऱ्या टप्प्यात येत आहे. भरलेल्या ऑक्सिजन बेडची संख्या कमी असली तरी पाॅझिटिव्हिटी रेट अधिक असल्याने जिल्हा तिसऱ्या टप्प्यात आला आहे.भंडारा जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट ७.६७ टक्के असून ऑक्युपाइड ऑक्सिजन बेड ४.४१ टक्के आहे. ज्या ठिकाणी पाॅझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरले आहे, तेथे पहिल्या टप्प्याचे निकष लागू होणार आहेत; परंतु भंडारा जिल्ह्यात भरलेले ऑक्सिजन बेड कमी असले तरी पाॅझिटिव्हिटी रेट कमी असल्याने तो तिसऱ्या टप्प्यात लागत आहे. अत्यावश्यक वस्तू व सेवांसह अन्य आस्थापनाही सुरू झाल्या आहेत. फक्त चित्रपटगृहे बंद राहणार आहेत. यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनाही ५० टक्के क्षमतेच्या आधारावर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विवाह सोहळ्यात ५० लोकांना परवानगी असेल; परंतु शनिवार व रविवार या दिवशी कार्यक्रमांना परवानगी नसेल. तसेच मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे.

काय सुरू राहील?

अत्यावश्यक वस्तूअंतर्गत व सेवांबाबतची दुकाने, व्यवस्थापना, प्रतिष्ठाने रोज रविवार ते शनिवार सकाळी सात ते चार वाजेपर्यंत सुरू राहतील.इतर (अत्यावश्यक व्यतिरिक्त) वस्तू व सेवांबाबत राहणार आहेत. मात्र यात शुक्रवारी दुपारी चार ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहील.उपाहारगृहे, हाॅटेल, खानावळी सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. बंदच्या दिवशी पार्सल सेवा सुरू राहील.आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक नियमित पूर्णवेळ, सार्वजनिक बस परिवहन पूर्ण क्षमतेने सुरू राहील. कृषी दुकाने रोज सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत सुरू.व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. उत्पादन क्षेत्र, बांधकाम, ई-काॅमर्स सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालय ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.

सोमवारपासून अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी जिल्हावासीयांनी त्रिसूत्री नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. याबाबतीत मी, प्रत्येकाने मास्क घालावेच असे आवाहन करीत आहे. कोविड नियमांचे पालन हे सर्वांच्याच सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी बाब आहे. अनलाॅक प्रक्रियेत आपल्याला अजून समोर जायचे आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी सतर्कता बाळगावी.-संदीप कदम, जिल्हाधिकारी, भंडारा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या