चिचाळ : चिचाळ येथून लग्नाची वरात घेवून जाणारी टाटा सुमो ही चिचाळ चकारा मार्गावरील टेकडीजवळ उलटली. ही घटना आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. सुमो एम. एच. ३२/ सी ६१५२ उलटली. यात अपघातात ११ वऱ्हाडी जखमी झाले. जखमींना अड्याळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची नोंद अड्याळ पोलीस ठाण्यात केली आहे.जखमींमध्ये वच्छला देशमुख (६०) रा. भिवापूर, फेकुबाई तलमले गोन्ना, रेवती ढवळे रा. अड्याळ, लिला देशमुख रा. भिवापूर, प्रतिभा गिऱ्हेपुंजे रा. पालोरा, सकु देशमुख रा. अड्याळ, बारुबाई बडवाईक रा. भंडारा, कुसूम तलमले रा. चिचाळ, शुभम हटवार रा. आकोट, ताराचंद गिऱ्हेपुंजे रा. पालोरा यांचा समावेश आहे. गंभीर जखमींना सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले आहे.घटनेची तक्रार खुशराम हरिभाऊ भुरे यांनी पोलीस ठाणे अड्याळ येथे केली. तपास ठाणेदार अजाबराव नेवारे, सहायक ठाणेदार विठ्ठल मोरे, पोलीस हवालदार धनराज बावणे करीत आहेत. (वार्ताहर)
वऱ्हाड्यांची सुमो उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 00:57 IST