पाेलीस मुख्यालयातील शासकीय निवासस्थान भासते नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 05:00 AM2020-12-14T05:00:00+5:302020-12-14T05:00:29+5:30

शासकीय निवासस्थान म्हणजे तात्पूरता निवारा. त्यामुळे येथे एक दाेन वर्षासाठी राहायला येणारा अधिकारी त्यात फारसा बदल करत नाही. शासकीय चाकाेरीत मिळणाऱ्या सुविधांवर समाधान माणून दिवस काढतात. मात्र शासकीय निवासस्थांनाचेही रंगरुप पालटणारी ध्यासमग्न मानस असली तर मरुद्यानाही बहरतील.याचा अनुभव भंडारा येथील पाेलीस मुख्यालयातील अपर पाेलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी येताे. अनिकेत भारती या निवासस्थानात राहायला आले तेव्हा इतर बंगल्याप्रमाणे हाही बंगला हाेता. 

Paradise is the official residence of the Paelis headquarters | पाेलीस मुख्यालयातील शासकीय निवासस्थान भासते नंदनवन

पाेलीस मुख्यालयातील शासकीय निवासस्थान भासते नंदनवन

Next

  लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रंग उडालेले शासकीय ओसाड बंगले. वाळलेली झाडे अन् अंगणभर पालापाचाेळा. परिसरात वाढलेली झुडपी वनस्पती असे काहीशे चित्र सर्वत्र पहायला मिळते. मात्र भंडारा जिल्हा पाेलीस मुख्यालयातील एक निवासस्थान मात्र याला अपवाद आहे. काही वर्षापूर्वी ओसाड असलेल्या या निवासस्थानाचे आता रुपच पालटले. असंख्य फुलझाडे, सुगंधी, शाेभवंत पानाफुलांची आरास, आकर्षक कुंड्या जणू नंदनवनच भासते. ही किमया केली आहे अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या निसर्गप्रेमी पत्नी गीतांजली भारती - पुरी यांनी.
शासकीय निवासस्थान म्हणजे तात्पूरता निवारा. त्यामुळे येथे एक दाेन वर्षासाठी राहायला येणारा अधिकारी त्यात फारसा बदल करत नाही. शासकीय चाकाेरीत मिळणाऱ्या सुविधांवर समाधान माणून दिवस काढतात. मात्र शासकीय निवासस्थांनाचेही रंगरुप पालटणारी ध्यासमग्न मानस असली तर मरुद्यानाही बहरतील.याचा अनुभव भंडारा येथील पाेलीस मुख्यालयातील अपर पाेलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी येताे. अनिकेत भारती या निवासस्थानात राहायला आले तेव्हा इतर बंगल्याप्रमाणे हाही बंगला हाेता. 
मात्र त्यांच्या निसर्गप्रेमी पत्नी गीतांजली यांनी अवघ्या एक वर्षात या बंगल्याचे रुपच पालटले. बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून तर शेवटपर्यंत काेपरान काेपरा फुलझाडांनी व्यापला आहे. सुरक्षा भिंतही फुलानी लदबदली आहे. प्रवेशद्वार उघडताच नजर जाते ती तेथे असलेल्या तब्बल ७०० ते ८०० कुंड्यांवर. विविध प्रकारची फुलझाडे माेठ्या मेहनतीने आणि हाैसेने गितांजली यांनी लावली आहे. लहानपणापासून घरात असलेल्या शेतकरी वातावरणाने त्यांना निसर्ग प्रेमी केले. जेथे जातात तेथील निवासस्थान ते बगीच्यात रुपांतरीत करतात.
आपण राहताे ते घर शासकीय असाे की स्वत:चे त्यात जीव ओतला की घर आपल्याला भरभरुन देते. असे गीतांजली भारती सांगतात. गुन्हे, तपास, धावपळ, पुरावे अशा ताणतणावात साहेब घरी परतल्यावर विसावा घेताना स्वच्छ व नितळ श्वास घेताना मनाचा थकवा कधी निघून जाताे. हे कळत नाही. पाेलीस अधिकाऱ्याची कर्तव्य निष्ठेने जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्याची गृहकर्तव्यदक्ष पत्नी म्हणून माझे घर आंनदात राहील असे वातावरण निर्माण करणे हे माझे कर्तव्य असे गीताजंली अभीमानाने सांगतात. रसायण शासत्रात पदव्युतर पदवी घेतलेल्या गीतांजली यांना गार्डलींगचा छंद आहे. दिवसातील दाेन ते तीन तास या छंदाला देतात. आपल्या दाेन चिमुकल्या मुलींच्या संगाेपनासाेबतच लतावेलींचे पाेटच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात. म्हणून आज त्यांच्या निवासस्थानात पाऊल ठेवले की नंदनवनात ठेवल्याचा भास हाेताे.

सासरी जाणाऱ्या लेकीसारखी अवस्था
शासकीय अधिकाऱ्याची सतत बदली हाेत असते.प्रत्येक वेळी नवीन निवासस्थान नशीबी येथे मात्र गीतांजली भारती कुठेही गेल्यातरी आपला छंद जाेपासून परिसर झाडाफुलांनी शाेभीवंत करतात. बदली झाल्यानंतर बहरलेले उद्यान साेडून जाताना सासरी जाणाऱ्या लेकीला निराेप देतात, तसा निराेप देते. असे सांगताना गीतांजली भाऊकही झाल्या. नव्या ठिकाणी पुन्हा नव्या बगीच्याची निर्मीती करते, असा त्या सांगातात. शासकीय निवासस्थानात परसबाग फुलविली असून सर्व भाजीपाला त्यांच्याच बागेतून स्वयंपाक घरात येताे.

 

Web Title: Paradise is the official residence of the Paelis headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.