शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

कीडनाशक फवारणीमुळे धानपीक वाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2016 00:30 IST

पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात निसर्गाची अवकृपा झाली असून दररोज पाऊस पडत असल्याने ..

पाऊस पिच्छा सोडेना : अस्मानी-सुलतानी संकटाचा सामनाकोंढा (कोसरा) : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात निसर्गाची अवकृपा झाली असून दररोज पाऊस पडत असल्याने हलक्या धानाचे पीक मातीमोल होत आहेत. अशातच शेतकऱ्यांनी धान पिकावर तुडतुडा किडीचा प्रार्दुभाव झाल्यामुळे कोसरा (कोंढा) येथील लक्ष्मी अ‍ॅग्रो एजन्सीतून सानवॉस कंपनीचे औषधी घेऊ न फवारणी केली असता शेतकऱ्यांचे उभे पीक वाळले. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना तक्रार देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. शेतकरी चौरास भागात धानाचे पिक वाचविण्यासाठी जीवाचा आटापीटा करीत आहे. पण निसर्गासोबत मानवी चुकामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिक जात आहे. कोंढा परिसरातील शेतकऱ्यांनी धानपिकावर तुडतुडा किडीचा प्रार्दुभाव वाढल्याने लक्ष्मी अ‍ॅग्रो एंजन्सी कोसरा येथून सानवॉस औषध दुकानदाराच्या सल्ल्यानुसार घेतले. सदर औषधी शेतात स्प्रे पंपाद्वारे फवारणी केली असता धान पिक रोगमुक्त होण्याऐवजी वाळून गेले आहे.या किडनाशक औषधाची धान पिकावर रिअ‍ॅक्शन झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान वाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिंपळगाव येथील श्रीधर येळणे यांच्या चार एकरातील धानपीक वाळल्याने २ लाख रूपयाचे नुकसान झाले. धनराज मोहरकर, रा. पिंपळगाव, मारोती जिभकाटे रा.कोंढा या शेतकऱ्यांचे धान या औषधीने वाळले. याशिवाय औषधी फवारणीने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.भंडारा/पालांदूर : जिल्ह्यात परतीच्या पावसाने अजुनही पिच्छा सोडलेला नाही. शेकडो एकरातील धानपीक पाण्याखाली आले आहे. पावसामुळे हलके धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी याचे सर्वेक्षण झालेले नाही. परंतु याची आकडेवारी कोट्यवधी घरात आहे. कालपासुन जिल्ह्यात वरूणराजाने दमदार हजेरी लावली. पालांदूर परिसरात मुसळधार पावसामुळे धान जमीनदोस्त झाले आहे. हलक्या धानाची नासाडी झाली आहे. नुकसानीचा आकडा सर्वेक्षणअभावी प्राप्त होऊ शकला नाही तरी उत्पादनावर याचा परिणाम होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खरीप हंगामात निसर्गाच्या कोपामुळे २० टक्के क्षेत्र पडीत असून जिल्हा प्रशासनाने घोषीत केलेल्या खरीपाची नजरअंदाज पैसेवारी ७२ पैसे काढली आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. सिंचनाच्या सहाय्याने कसेबसे पिक लागवड केले. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. या हजेरीमुळे उत्पन्नात वाढ होईल अशी आशा होती. मात्र आॅगस्ट महिना उन्हाळ्यासारखा तापल्याने पिके करपली. परतीच्या पावसाने सुरुवात केली. हा पाऊस हलक्या प्रतीच्या धानासाठी कर्दनकाळ ठरत आहे.कापलेल्या धानाच्या कडपामध्ये पाणी शिरले आहे. या कडपांमधून वास येत असून बळीराजाचे टेंशन वाढले आहे. धान कमी पण निंदण जास्त अशी स्थिती सप्टेंबर महिन्याच्या पहिला व दुसऱ्या हप्त्यात होती. ढगाळ हवामानामुळे किडीचा उपद्रव वाढला. कापणीच्या धानाला तुडतुडा, लष्करी अळी, करपा या रोगाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)औषधी डिफॉल्ट असल्याचे वाटत आहे. यासंबंधात पिकांचे सँपल काढून प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल.-ए. डी. गजभिये, तालुका कृषी अधिकारी, पवनी.पंजाबराव कृषी विज्ञान केंद्र साकोली, येथील वैज्ञानिकांची चमू पिकांचे निरीक्षण करुन अहवाल तयार करतील कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यात येईल.- बी.एन.मेहर, कृषी विस्तार अधिकारी, पवनीसानवॅस कंपनीचा डीलर आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर औषधाची विक्री बंद केली आहे. शेतकऱ्यांला कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यास पूर्णपणे मदत करणार आहे.- पी.पी. लांजेवार, संचालक लक्ष्मी अ‍ॅग्रो एजन्सी, कोसरा.