शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
4
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
5
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
6
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
7
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
8
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
9
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
10
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

पालांदूर परिसर पावसासाठी आतुरलेलाच

By admin | Published: July 20, 2015 12:29 AM

चक्क दोन आठवडे रजेवर असलेला वरुणराजा काल शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हजेरी लावली.

१७.६ मिमी पावसाची हजेरी : पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिलपालांदूर : चक्क दोन आठवडे रजेवर असलेला वरुणराजा काल शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हजेरी लावली. अवकाशात ढग दाटून आले, गडगडाट सुरु झाला. जोरदार वर्षावाची आस लागली असतानाच आशा निराशेत बदलली. केवळ १७.६ मिमी पावसाची नोंद झाली. काल आठवडी बाजार असतांना पावसाची हजेरी पाहून शेतकऱ्यांसह मजुरांनी काही अंशी समाधान व्यक्त केले. अर्धा तास गर्दी जमली पण पाऊस थांबल्याने जैसे-थे सघडले.पालांदूर परिसरात कृषी विभागाच्या अंदाजानुसार ११७८४.४५ एकूण हेक्टरपैकी प्रत्यक्षात आवत्या १२७७ हेक्टर, रोवणी १२३०, पऱ्हे ९३७.६४ (नर्सरी), तूर ७४१, हळद १९.८, ऊस १९.९०, केळी ६.२०, भाजीपाला २८.३० इतर ४८.४० हेक्टरवर पिकांची लावगड केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून धुळपेरणीस आंरभ झाला असून पावसाने ओढताण दिल्याने पिक संकटात आले आहे. चुलबंध नदीखोऱ्यात स्वतंत्र सिंचन क्षेत्रात ८० टक्के रोवणी आटोपली तर कोरडवाहू शेतीत केवळ १२ टक्के रोवणी उसनवारीवर झाली आहे. नदी, नाले, अजुनही कोरडेच आहेत. खर्चाची मर्यादा अतोनात वाढल्याने धान शेती पाण्याची सुध्दा परवडणारी राहिली नाही. पऱ्हे करपले असून कालचा पाऊस नर्सरीला जीवनदायिनी ठरला आहे. वेळ कमी असल्याने दुबारपेरणी न करता आहे त्यातच उरकवण्याचा विचार शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे.ज्या ठिकाणी रोवणी करण्यात आली तिथे भेगा पडल्याने चिखलही कडक झाला आहे. यामुळे धानपिक जसा लावला तश्याच स्थितीत आहे. आता पाऊस आला ही तरी उत्पादनात निम्मा, पुरक अपेक्षीत आहे. मऱ्हेगाव फिडरवर पाणी आहे पण वीज नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागील तीन वर्षांचा दुष्काळ डोक्यावर असतांना पुढचे नियोजन करने शेतकऱ्याला अवघड झाले आहे. उत्साहपूर्वक शेती कसण्याची मानसिकता उरली नाही. कृषी केंद्रात खते, किटकनाशके पडून आहेत. मागणीच नसल्याने कृषी केंद्रधारकही व्यवसाय कसा राहिल, या विवंचनेत आहेत. उधारीचे प्रमाण वाढून नफयाची टक्केवारी कमी झाली. यामुळे जोडधंदा म्हणून हार्डवेअर, सिमेंट विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या चार दिवसात मोठ्या पावसाची अपेक्षा दिसत नाही. परंतू आठवड्याभरात जर पावसाने जोरदार हजेरी लावली नाही तर रोवणी होणार नाही, असा शेतकऱ्यांचे म्हणने आहे. पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होईल. जागृत नागरिक आतापासूनच दृष्काळ पाहून खर्च अत्यल्प करित आहे. बाजारपेठेत अजिबात चालना नाही. मंदीचे ग्रहण लागल्याचे विचार पालांदूरचे होलसेल किराणा व्यापारी हाजी इद्रिस लध्धानी, ईकाबाल भुरा, वसंता बारई, शालीक हटवार यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. (वार्ताहर)