शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

धान खरेदी केंद्रासाठी युतीचे आमदार सभागृहात गरजले

By admin | Updated: June 10, 2014 23:51 IST

जिल्ह्यातील बंद झालेले धान खरेदी केंद्र सुरु करा, या मागणीसाठी मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवर अन्न पुरवठा मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आ.नरेंद्र भोंडेकर यांनी सभागृहात

भंडारा : जिल्ह्यातील बंद झालेले धान खरेदी केंद्र सुरु करा, या मागणीसाठी मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवर अन्न पुरवठा मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आ.नरेंद्र भोंडेकर यांनी सभागृहात शासनाविरुद्ध जोरदार घोषणा दिल्या. यावर्षी शासनाने धान खरेदी केंद्र ३० जूनपर्यंत सुरू ठेवण्याचे परिपत्रक काढले. परंतु ८ मे २०१४ रोजी शासनाने दुसरे परिपत्रक काढून १५ मे २०१४ ला धान खरेदी केंद्र बंद करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे या प्रश्नावर आ.नरेंद्र भोंडेकर, आ.राजकुमार बडोले आ.खुशाल बोपचे, आ.देवेंद्र फडणवीस, आ.सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना लावली. धान खरेदीबद्दल ८ मे चे परिपत्रक रद्द करून ३० जूनपर्यंत धान खरेदी केंद्र सुरु ठेवण्याची विनंती सभागृहास आ.नरेंद्र भोंडेकर, आ.देवेंद्र फडणवीस, आ.खुशाल बोपचे, आ.राजकुमार बडोले यांनी विनंती केली असता मुख्यमंत्री व अन्न पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर सभागृह दोनदा बंद झाले. पुन्हा सभागृह सुरु करण्यात आले त्यावेळी धान खरेदी केंद्राचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हाही समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे घोषणा करीत आ.भोंडेकर व आ.बडोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ पोहोचले. त्यानंतर धान खरेदी केंद्र सुरु ठेवण्याबाबत उद्या (दि.११) रोजी निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. उद्या सभागृहात धान खरेदी केंद्र ३० जूनपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले नाही तर या मागणीवर ठाम राहणार असल्याचे आ.भोंडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. धान खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे धान उत्पादक भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. राज्य शासनाने जाणीवपूर्वक हे केंद्र बंद करुन शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळत आहे, असा आरोपही आ.भोंडेकर यांनी केला. (जिल्हा प्रतिनिधी)