शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तलावाच्या जिल्ह्यात सिंचनाअभावी भातशेती झाली कोरडवाहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:52 IST

पवनी व लाखांदूर तालुक्यातील जमीन काळी व कसदार आहे. या भागातील शेतकरी विहिरीच्या पाण्यामुळे गत ४० वर्षापासून दुबार शेती करीत होते. परंतु गोसेखुर्द धरण बांधकामापासून भूमीगत प्रवाह बंद झाल्यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ८० टक्के विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

ठळक मुद्दे८० टक्के विहिरी पडल्या कोरड्या। धानाचे पऱ्हे जगवणेही झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौरास) : पवनी व लाखांदूर तालुक्यातील जमीन काळी व कसदार आहे. या भागातील शेतकरी विहिरीच्या पाण्यामुळे गत ४० वर्षापासून दुबार शेती करीत होते. परंतु गोसेखुर्द धरण बांधकामापासून भूमीगत प्रवाह बंद झाल्यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ८० टक्के विहिरी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी उन्हाळ्यामध्ये हिरवेगाव दिसणारे शेत दिसेनासे झाले असून भात शेतकऱ्यांना धानाचे पऱ्हे (नर्सरी) जगवणे कठीण झाले आहे.भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहते. तीच नाळ चौरास भागाशी जुळली आहे. वैनगंगा नदीवर गोसेखुर्द हा महत्वाकांक्षी प्रकल्प झाला आहे. धरणाच्या डाव्या कालव्यातून चौरास भागात विहिरीला पाणी पुरवठा होणारा प्रवाह धरणाच्या पाळीचे बांधकाम करण्यात आले. येथूनच चौरास भागातील शेतीला घरघर लागली. कालांतराने नदीचा प्रवाह बदलला गेला. तरीही जमीनीच्या आतमध्ये वैनगंगा नदीच्या भूमिगत प्रवाह चौरास परिसरात सुरु होता.चौरास भागात मोठ्या प्रमाणावर जलसाठा होता. त्यामुळे शेतकरी जेथे विहिर खोदेल तेथे जलसाठा मिळत होता व कृषी पंप चालत होते. सर्वात जास्त विद्युत पंप आता ही चौरास भागात आहेत. पण आता बंद पडलेले आहेत. यापुर्वी खरीप धान, रबी डाळ वर्गीय पिके, रबी धान या तिन्ही फसली शेतकरी हमखास घेत होता. मात्र आता त्याला एकाही पिकाची हमी राहिलेली नाही.धरणामुळे परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा होती. परंतु ३२ वर्षाचा कालावधी लोटूनही व प्रकल्प पूर्ण झाला असला तरी उजव्या व डाव्या कालवाच्या पाणी वाहून नेणाऱ्या वितरीका पूर्ण झाल्या नाहीत. या कालव्यामुळे शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळणे दुर्लक्षीत झाले आहे.गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यासाठी चौरास भागातून २२ किमी लांबीचा डावा कालवा तयार करण्यात आला. शेतकरी दरवर्षी या कालव्यातून पाणी मिळेल म्हणून वाट पाहात आहेत. मात्र धरणाच्या वितरीकेची कामे सुरु होतात. पण पूर्ण ती पूर्ण केली जात नाही. दिवसेंदिवस कालव्याच्या रकमेत चौपटीने वाढ होत असल्याचे सांगण्यात येतेबळीराजाच्या चिंतेत वाढ, संसारासाठी उसनवारचौरास भागात असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाअभावी निसर्गाचा पाण्याची आवश्यकता आहे. असे असताना मृग नक्षत्र लोटूनही पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करुन शेती कसण्यासाठी उसनवार रक्कम घेत आहेत.

टॅग्स :agricultureशेती